शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिंदे सरकारला थेट सवाल केला की जाहीर केलेली शेतकरी मदत प्रत्यक्षात किती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे.
दानवे यांनी सरकारला पारदर्शकतेसाठी आकडेवारी जाहीर करण्याचे आव्हान दिले आहे.
या विधानामुळे शिंदे सरकारवर शेतकरी मदतीच्या विषयावर दबाव निर्माण झाला आहे.
Marathwada Heavy Rainfall News : राज्य सरकारकडून अतिवृष्टी, ढगफुटी,पूर, पीकांचे नुकसान, अवकाळी पाऊस, सततचा पाऊस अशा नैसर्गीक संकटाच्या काळात शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये दिल्याची आकडेवारी सांगीतली जाते. प्रत्यक्षात मदतीची किती रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झाली हे एकदा राज्य सरकारने जाहीर पत्रकार परिषद घेऊन सांगावे, असे खुले आव्हान शिवसेना नेते अंबादास दानव यांनी दिले.
विशेषतः नुकसानग्रस्त भागाची जॅकेट घालून पाहणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात जाहीर केलेल्या मदतीचा हिशोब सांगावा, असेही दानवे म्हणाले. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच मराठवाडा आपत्तग्रस्त भागाचा दौरा करत शेतकरी, सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली नाही, तर मराठवाड्यात मोर्चा काढण्याची तयारीही सूरू केली आहे.
दुसरीकडे शिवसेना नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी 2023 ते आॅगस्ट 2024 रोजी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या मदतीची आकडेवारी मांडत सरकारला जाब विचारला आहे. नुसती आकड्यांची यादी देणाऱ्या सरकारने शेतकऱ्यांना प्रत्यक्षात किती मदत मिळाली हे एकदा जाहीर करावे, असे आव्हान दिले आहे. अगोदरच्या रकमा द्यायच्या नाहीत आणि पुन्हा आम्ही मदत करतो म्हणून प्रश्न विचारणाऱ्या शेतकऱ्याला दमदाटी करायची! हे असले यांचे शासन, अशी टीका दानवे यांनी केली.
ती करत असतनाच हे आहेत 2023 सालापासून ऑगस्ट 2024 पर्यंतचे सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषित केलेले आकडे. यातील किती रक्कम आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात गेली हे सरकारने पत्रकार परिषद घेऊन सांगायला हवे. घोषणासम्राट आणि आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा त्यांच्या काळातील घोषणांवर प्राधान्याने बोलायला हवे, नुसतं जाकीट घालून बोटीत हिंडून होत नसतं, याच्यातील 30 टक्के रक्कमही शेतकऱ्यांच्या हाती गेलेली नाही, असा टोला आणि दावाही अंबादास दानवे यांनी केला.
शेतकऱ्यांचा आक्रोश ऐका..
राज्य सरकारने शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकला पाहिजे.अतिवृष्टीच्या नुकसानीने संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी होरपळला गेला आहे. गंभीर परिस्थितीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर असायला हवे, नाहीतर शेतकरी राजा असह्य परिस्थितीमुळे टोकाचे पाऊल उचलू शकतो, अशी भिती दानवे यांनी व्यक्त केली.
राज्य सरकारने तातडीने निर्णय घेत शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करायला पाहिजे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून या गंभीर परिस्थितीतून शेतकऱ्यांना बाहेर पडण्यासाठी हेक्टरी 50 हजार नुकसान भरपाई मिळायला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
प्र.1: अंबादास दानवे यांनी नेमका कोणता सवाल उपस्थित केला?
उ. जाहीर केलेली शेतकरी मदत प्रत्यक्षात किती पोहोचली हे सरकारने स्पष्ट करावे, असा सवाल त्यांनी केला.
प्र.2: हा सवाल कोणत्या संदर्भात करण्यात आला?
उ. शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत आणि प्रत्यक्ष मिळालेली मदत यात फरक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
प्र.3: या मुद्द्यावर सरकारची प्रतिक्रिया काय असू शकते?
उ. सरकारकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्याची मागणी होत आहे.
प्र.4: या प्रश्नामुळे शेतकरी आणि राजकीय पातळीवर काय परिणाम होऊ शकतो?
उ. शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढू शकतो आणि राजकीय दबाव सरकारवर आणखी वाढू शकतो.
प्र.5: अंबादास दानवे कोणत्या पक्षाचे नेते आहेत?
उ. ते शिवसेना (यूबीटी) चे प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.