CM Devendra Fadnavis announces relaxation in panchanama rules to provide relief for rain-hit Marathwada farmers. Sarkarnama
महाराष्ट्र

Marathwada Flood News : मराठवाड्यातील पुरग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा : फडणवीस सरकारने पंचनाम्याच्या अटी बदलल्या

Marathwada Flood News : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामा नियम शिथिल करत भरपाई लवकर मिळेल असे आश्वासन दिले.

Hrishikesh Nalagune

Marathwada Flood News : अतिवृष्टीने हवालदिल झालेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनाम्याचे नियम शिथिल करत असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय अधिकाऱ्यांनीही शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी मिळेल याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (24 सप्टेंबर) सोलापूरमधील निमगाव आणि दारफळ, तर लातूरमधील औसा तालुक्यात उजनी गावात पहाणी दौरा केला. यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, आमच्याकडे जे पंचानामे येत आहेत, त्यावर आम्ही कारवाई करत आहोत. जिथे जाऊन पंचनामा करणे शक्य नाही तिथे ड्रोन पंचनामाही ग्राह्य धरला जाईल. कोणी अगदी मोबाईल फोटो काढून दिला तरी तो पंचनामा म्हणून मान्य केला जाणार आहे. त्या भागात केवळ पाणी गेलं आहे एवढेच आपल्या रेकॉर्डला असले पाहिजे.

याशिवाय पंचनाम्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी थोडं सहानुभूतीने पंचनामे करावेत. जास्त नियम सांगत बसू नये. जास्तीत जास्त कशी मदत देता येईल याचा विचार करावा अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. या कठीण परिस्थितीत सरकार म्हणून आम्ही शेतकऱ्याला व नुकसान झालेल्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आपल्या सर्व मागण्या पूर्ण केल्या जातील आपण चिंता करण्याची गरज नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.

सोलापुरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि सर्वपक्षीय आमदार, खासदार, अधिकारी यावेळी त्यांच्यासोबत होते. शेतकऱ्यांचे अतिवृष्टी, ढगफुटी, पूराने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत. तातडीच्या मदतीसह कर्जमाफी आणि ओला दुष्काळा जाहीर करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT