Maharashtra Rain update : फडणवीस सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर; 8-10 दिवसांत बँकेत जमा होणार, मराठवाड्याला सर्वाधिक...

Maharashtra Rainfall Impact on Farmers : सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
"Fadnavis government announces financial aid to farmers affected by heavy rainfall in Maharashtra, to be credited within 8–10 days."
"Fadnavis government announces financial aid to farmers affected by heavy rainfall in Maharashtra, to be credited within 8–10 days."
Published on
Updated on

Fadnavis Government Announces Financial Aid : राज्यात मॉन्सून दाखल झाल्यापासून मुसळधार सुरू आहे. जून महिन्यापासून अनेक गावांना पावसाने झोडपून काढल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. घरांची पडझड झाली असून पुराच्या पाण्यात जनावरेही वाहून गेली आहेत. त्यामुळे लाखो शेतकरी हवालदिल झाले आहेत. यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी शेतकऱ्यांसाठी १ हजार ३३९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

जून ते ऑगस्ट या कालावधीत विविध जिल्ह्यांत झालेली अतिवृष्टी व पूर यामुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी ही मदत जाहीर करण्यात आली आहे. याचा फायदा राज्यांतील १९ लाख २२ हजार ९०९ शेतकऱ्यांना होणार आहे. सर्वाधिक १० लाख ३५ हजार शेतकरी मराठवाड्यातील आहेत. याच भागासाठी सर्वाधिक ७२१ कोटींचा निधी देण्यात येणार आहे.

सरकारने जाहीर केलेली आर्थिक मदत डीबीटी पोर्टलद्वारे थेट शेतीपिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे. तसेच लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वेबसाईटवर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील लाभार्थी कोण, याची माहिती सहज उपलब्ध होणार आहे.

"Fadnavis government announces financial aid to farmers affected by heavy rainfall in Maharashtra, to be credited within 8–10 days."
Ajit Pawar NCP : चिंतन शिबीर आटोपताच अजित पवारांना धक्का; जिल्हाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा  

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, आतापर्यंत एकूण २२१५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून त्याचा लाभ ३१ लाख ६४ हजार शेतकऱ्यांना झाला आहे. आतापर्यंत १८२९ कोटी रुपयांची निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. उर्वरित निधी ८ ते १० दिवसांत मिळेल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

कोणत्या विभागाला किती निधी?

सरकारने मंगळवारी काढलेल्या शासन निर्णयानुसार, अमरावती विभागातील ७ लाख ८८ हजार ९७४ शेतकऱ्ना ५६५ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर विदर्भातील नागपूर विभागातील ३७ हजार ६३१ शेतकऱ्यांना २३ कोटी रुपयांची मदत दिली जाईल. पुणे विभागात सर्वात कमी नुकसान झाले आहे. विभागातील केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील ३६ हजार ५५९ शेतकऱ्यांना सुमारे १४ कोटी रुपये मदत जाहीर झाली आहे.

"Fadnavis government announces financial aid to farmers affected by heavy rainfall in Maharashtra, to be credited within 8–10 days."
Narhari Zirwal News : झिरवाळांच्या विभागात नवनियुक्त अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचं ट्रेनिंग? विजय कुंभार यांचा थेट आरोप, मिळाला 'पंचतारांकित' व्हिडीओ

छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वात जास्त शेतीचे नुकसान झाले आहे. तब्बल १० लाख ३५ हजार शेतकरी बाधित असून त्यांना ७२१ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सर्वाधिक बाधित शेतकरी लातूर जिल्ह्यात ३ लाख ८० हजार एवढे आहेत. त्याचप्रमाणे हिंगोली, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचा आकडाही मोठा आहे. नाशिक विभागातील १७ हजार ३३२ कोटी शेतकऱ्यांना ९ कोटी ८६ लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com