Devendra Fadnavis 
महाराष्ट्र

Devendra Fadnavis: जरांगेंनी समोर आणलेल्या 'त्या' ऑडिओ क्लीपबाबत मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; शिवसेनेच्या शिष्टमंडळाला काय दिलं आश्वासन?

Devendra Fadnavis: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी खळबळ उडवून दिलेल्या ५०० कोटी रुपयांचा उल्लेख असलेल्या ऑडिओ क्लीप प्रकरणी काल एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

Amit Ujagare

Devendra Fadnavis: मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी खळबळ उडवून दिलेल्या ५०० कोटी रुपयांचा उल्लेख असलेल्या ऑडिओ क्लीप प्रकरणी काल एकनाथ शिंदेंच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत नेमकं काय घडलं? याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनीच आज नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना केला. फडणवीसांनी याप्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

फडणवीस म्हणाले, "काल मी त्यांना अतिशय स्ष्टपणे सांगितलेलं आहे की जी काही क्लीप किंवा संभाषण समोर आलेलं आहे. त्याची पूर्णपणे फॉरेन्सिक तपासणी होईल, आम्हाला हा सगळ्यांनाच हा प्रश्न पडला आहे की अडीच वर्षांपूर्वीचं हे संभाषण आजच बाहेर येण्यामागचा हेतू काय आहे? कोणाला टार्गेट केलं जात आहे? कशासाठी केलं जात आहे? यासंदर्भातील अनेक प्रश्न आहेत. निश्चितपणे याच्या चौकशीची मागणी जरांगे, शिंदेंचं शिष्टमंडळ आणि भाजपनं केली आहे. त्यामुळं त्याची फॉरेन्सिक चौकशी करुन सत्य समोर आणलं जाईल"

दरम्यान, ही ऑडिओ क्लीप बाहेर आल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत भाजपनं स्पष्टीकरण देण्याची मागणी केली होती. त्याचबरोबर रामदास कदम, संजय शिरसाट या शिंदेंच्या नेत्यांनी देखील शिवसेनेची बाजू मांडली होती. एकनाथ शिंदेंविरोधात कट-कारस्थान रचलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. तर नरेश म्हस्के यांनी थेट या ऑडिओ क्लीपमध्ये ज्या भाजपच्या लोकांमध्ये संभाषण सुरु आहे त्यांची नावचं जाहीर केली होती. त्यानंतर शिंदेंच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेण्याचा निर्णय घेतला आणि ही भेटही झाली. यावेळी या ऑ़डिओ क्लीपची सत्यता पडताळली जावी यासाठी फॉरेन्सिक तपासणीची मागणीही त्यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT