मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठकांचा धडाका लावला असून पायाभूत सुविधासंदर्भातील निर्णयांवर त्यांचा भर दिसून येत आहे. खातेवाटप झाल्यानंतर फडणवीसांनी संबधित मंत्र्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांच्यासह त्यांनी परिवहन विभागाचा आढावा घेतला. पारदर्शक सरकार चालवण्यासाठी देवेंद्र फडणवीस सध्या अॅक्शन मोडवर आहेत.
या बैठकीत राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राज्य सरकारच्या प्रत्येक खात्याने पुढील १०० दिवसांसाठी कृती आराखडा तयार करावा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. या निर्णयामुळे राज्यातील विकास कामांना गती मिळणार असून प्रत्येक खात्याचे उद्दिष्ट ठरवून त्यावर कार्यवाही केली जाणार आहे.
परिवहन विभागाच्यावतीने शाश्वत व अद्ययावत सेवा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. राज्यातील परिवहन क्षेत्राला सुरक्षित, सुंदर आणि शाश्वत ठेवण्यासाठी पुढील 3 वर्षात नवीन ई.व्ही.पॉलिसी घोषित करण्याबरोबरच 15 वर्ष जूनी झालेली वाहने भंगारात काढावी. रस्ते अपघाताचे प्रमाण करण्यासाठी ए.आय.चा वापर करून रस्ते सुरक्षा वाढविण्यावर भर देण्यात यावा. यासंदर्भात गुगलशी करार झाला असल्याने त्याचा वापर करावा. त्याचबरोबर घाटात मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने यावर इंजिनियरिंग सोल्यूशन शोधून काढावे, असे सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आजच्या बैठकीत दिल्या.
राज्यात परिवहन सेवेला अधिक गती देण्यासाठी राज्यात बाईक टॅक्सी, मॅक्सी कॅब सुरू करण्यावर भर देण्यात यावा. त्याचबरोबर जुन्या 13 हजार शासकीय वाहने भंगारात काढली जावी. तसेच टॅक्सी, ॲटो, शहर बस सेवेचे तिकीट दरासंदर्भात निर्णय घेण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. वडसा-गडचिरोली तसेच सोलापूर-उस्मानाबाद येथील रेल्वे प्रकल्पाचे काम हाती घेण्याची सूचना केली.
राज्य परिवहन सेवेच्या 15 वर्षे झालेल्या बसेस भंगारात टाकून उर्वरित बसेसमध्ये एल.एन.जी. तसेच सी.एन.जी. बसविण्यात यावी जेणेकरून बसेसची कार्यक्षमता वाढेल. बसेसच्या सुरक्षेसाठी एस.ओ.पी. निश्चित करण्याच्याही सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या. यावेळी बंदरे तसेच विमानतळ प्राधिकरण आदिबाबतची चर्चा करण्यात आली.
सह्याद्री अतिथीगृह येथे परिवहन, बंदरे आणि महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरण या विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला. या बैठकीस अन्नप व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲङ आशिष शेलार, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यमंत्री योगेश कदम उपस्थित होते.
तर मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव संजय सेठी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, प्रधान सचिव रणजीतसिंह देओल, प्रधान सचिव एकनाथ डवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, सचिव विरेंद्र सिंह, सचिव रविंद्र सिंह, परिवहन आयुक्त विवेक भिमनवार तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.