Santosh Deshmukh Case : CID च्या 9 पथकांसह 150 हून अधिक पोलिसांकडून शोधाशोध, तरीही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी मोकाटच

Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना शोधण्यासाठी सीआयडीची 9 पथके आणि 150 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. तरीही अद्याप आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही. या प्रकरणी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे तर 2 कोटीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड फरार आहेत.
Santosh Deshmukh
Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Beed News, 31 Dec : बीड (Beed) जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. आरोपींना अटक करावी या मागणीसाठी सर्वच पक्षातील नेत्यांकडून मागणी केली जात आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे.

मात्र, या हत्या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा केला जात असलेले, वाल्मिक कराड, (Valmik Karad) सुदर्शन घुले याच्यासह 4 फरार आरोपी अद्यापही फरार आहेत. त्यामुळे पोलिसांनंतर आता सीआयडीला देखील या आरोपींना पकडण्यात अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे या आरोपींना शोधण्यासाठी सीआयडीची 9 पथके आणि 150 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. तरीही अद्याप आरोपींचा थांगपत्ता लागलेला नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे तर 2 कोटीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड फरार आहेत.

Santosh Deshmukh
Sanjay Raut News : 'तो' फोटो! खासदार राऊतांचे सूचक ट्विट; व्वा! क्या सीन है? नक्की कोण कुणाचा 'आका'?

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devedra Fadnavis) यांनी फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी न्यायालयात पत्र देऊन जप्तीची कार्यवाही सुरू केल्याची माहिती आहे. दरम्यान, या सर्व प्रकरणाच्या तपासणीचा आढावा घेण्यासाठी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी सोमवारी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे.

Santosh Deshmukh
Sarpanch Parishad : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सरकारला 7 जानेवारीची डेडलाइन; सरपंच परिषदेचा आंदोलनाचा इशारा

पोलिस यंत्रणा संशयाच्या फेऱ्यात

वाल्मिक कराडवर तब्बल 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही त्याच्याकडे शस्त्र परवाना होता. एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होईपर्यंत २ पोलिस बॉडीगार्डही त्याच्या सुरक्षेसाठी होते. त्यामुळे पोलिसांची (Police) भूमिका संशयास्पद आहे. त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील पोलिसांवर सुरू असलेल्या आरोपांत आणखी भर पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com