Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis Politics : शेतकऱ्यांना मोठा दिलासा, बँकांची कर्ज वसुली थांबणार! देवेंद्र फडणवीसांनी निर्देश दिले

Devendra Fadnavis Loan Recovery Farmers : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांकडून होत असलेल्या कर्ज वसुली बाबत महत्त्वाचे निर्देश देत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

Roshan More

Devendra Fadnavis News : अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधी घेतलेल्या कर्ज देखील फेडलेले नसताना अस्मानी संकटाने शेतकऱ्यांचे पुन्हा कर्ज मिळवण्याचे मार्ग देखील बंद झाले आहेत. बँकांकडून कर्ज घेतलेल्यांमध्ये 25 लाख शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्यात बँकांकडून कर्ज वसुली सुरू केली जाणार असल्याने शेतकरी चिंतेत होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

फडणवीस म्हणाले की, आपत्तीग्रस्त भागातील नागरिकांना, शेतकऱ्यांना टंचाई प्रमाणेच सर्व सवलती, उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकडील कर्जाची वसुली थांबवावी, असे निर्देशही बँकाने दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी सध्या अडचणीत आहे. हे लक्षात घेऊन बँकांना वसुली थांबवण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. तसेच पूरग्रस्त कुटुंबांना गहू-तांदूळ, डाळी व आवश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात येत आहे. विहीर खचणे, शेतजमीन खरडून जाणे, अशा केंद्र सरकारच्या निकषाबाहेर जाऊन, झालेल्या नुकसानीवरही राज्य सरकार स्वतंत्र मदत करणार आहे.

नुकसानीचे पंचनामे दोन-तीन दिवसांत पूर्ण होऊन पुढील आठवड्यात केंद्राला प्रस्ताव पाठवला जाणार आहे. मात्र, केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने स्वतःच्या निधीतून मदत सुरू केली असून नंतर केंद्राकडून ती रक्कम ‘रिइम्बर्समेंट’च्या स्वरूपात मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असली तरी आपत्ती व्यवस्थापन नियमावलीत ( मॅन्युअल) अशी व्याख्येचा समावेश नाही. असे असले तरी टंचाई निवारण काळातील निकषांप्रमाणेच सर्व सवलती व उपाययोजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रतिटनामागे 15 रुपये कपात

गळीप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. या हंगामात मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये कपात आणि पूरग्रस्तांच्या मदतीसाठी प्रतिटन ५ रुपये कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचे पैसे कापून शेतकऱ्यांनाच देणार त्यापेक्षा शक्तीपीठाचे 20 हजार कोटी नुकसाग्रस्तांना द्या, अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT