Dasara Melava : 'ठाकरेंसाठी 9 आकडा लाभदायक असल्याचं सांगितल्यामुळेच 63 कोटींचा दसरा मेळावा...', भाजप नेत्याचा खळबळजनक दावा

Uddhav Thackeray Dasara Melava 2025 : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. तर ठाकरेंनी हा दसरा मेळावा रद्द करून मराठवाड्यासाठी मदत जाहीर करावी अशी मागणी करत भाजपकडून ठाकरेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
The Shiv Sena (UBT) Dasara Melava
The Shiv Sena (UBT) Dasara Melava at Shivaji Park, Mumbai, highlights political debates as BJP targets Uddhav Thackeray over 63 crore rally expenses.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 01 Oct : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर आयोजित करण्यात आला आहे. तर ठाकरेंनी हा दसरा मेळावा रद्द करून मराठवाड्यासाठी मदत जाहीर करावी अशी मागणी करत भाजपकडून ठाकरेंवर हल्लाबोल करण्यात आला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीएम केअरचे पैसे पूरग्रस्तांसाठी द्यावे, अशी मागणी केल्यापासून भाजपकडून ठाकरेंना टार्गेट केलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता ठाकरेंच्या दसरा मेळाव्याचे नियोजनही 63 कोटींच्या घरात असून नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात, असा खळबळजनक दावा भाजप नेते केशव उपाध्ये यांनी केला आहे.

उपाध्ये यांनी एक्सवर एक पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, '63 कोटीचा दसरा मेळावा नऊ हा ‘आकडा’ लाभदायक असल्याचे कुणीतरी सांगितल्यापासून उबाठाचे सगळे व्यवहार या आकड्यांवर अवलंबून असतात. निवडणुकीतील उमेदवारांच्या संख्येची बेरीज नऊ हवी, टक्केवारी नऊपेक्षा कमी नसावी.

इतकेच काय, दोघा भावांमध्ये असलेल्या 36 च्या आकड्याची बेरीजही नऊ असावी याची नेहमीच काळजी घेणाऱ्या या गटाचा दसरा मेळाव्याचे नियोजनही 63 कोटींच्या घरात असणार आहे. गटाच्या गोटातील सूत्रांनी दिलेली ही अत्यंत खात्रीलायक माहिती,' असा दावा उपाध्ये यांनी केला आहे.

The Shiv Sena (UBT) Dasara Melava
Maharashtra Flood Relief: फडणवीस सरकारकडून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांवरच पूरभार, प्रतिटन 15 रुपयांची कपात केली जाणार

तर या मेळाव्यासाठी तब्बल 63 कोटीचे नियोजन झाल्याचे या गटातील नेत्यानेच हर्षोल्हासित होत सांगितलं असून सभा ठिकाण, स्टेज सजावट, जाहिराती, सोशल मिडीया, त्याशिवाय लोकांना आणायला गाड्या, गाडीत बसून लोकांनी मेळाव्याला यावे म्हणून, शिवाय त्यांच्या वडापाव, चहापाण्याची व्यवस्था असं सगळं मिळून हे 63 कोटी लागणार आहेत म्हणे.

या 63 कोटी मध्ये अतीवृष्टीच्या संकटात सापडलेल्या मराठवाड्यात किती गावातील शेतकऱ्यांना मदत झाली असती? किती घरे वसवली गेली असती? असा सवालही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये उपस्थित केला आहे. उपाध्ये यांनी पुढं लिहिलं की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना लोक स्वतःहून उत्साहात यायचे. तेव्हा सेना प्रमुखाचं विचारांच सोनं असायच. आता तशी परिस्थिती नाही.

The Shiv Sena (UBT) Dasara Melava
Ladki Bahin Yojana : सरकारच्या नव्या नियमामुळे लाडक्या बहि‍णींची पैसे मिळवण्यासाठीची वाट आणखी खडतर, आता पती आणि वडिलांचीही...

मागचे काही मेळावे आठवा, मिंधे, खंजीर, माझा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं ही रडगाणी ऐकायला एकट्या गटातून गर्दी पण गोळा होत नाही म्हणून 36 चा आकडा मोडून 63 ची गोळाबेरीज करण्याचा हा आटापीटा आहे. नाकी नऊ आले म्हणतात ते हेच, रडगाण्याचे तेच बेसूर सूर आळवायला खरंच 63 कोटीचा मेळावा घ्यायची गरज आहे का? हवं तर उद्धव ठाकरेंच्या नावाने मराठवाड्यात मदत करा पण हे 63 कोटी महाराष्ट्राच्याच उभारणीत लावा, अशा शब्दात केशव उपाध्ये यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com