Devendra Fadnavis, Indrajit Sawant Sarkarnama
महाराष्ट्र

Indrajit Sawant Case : मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश अन् पोलिस यंत्रणा वेगानं हलली; इंद्रजीत सावंत धमकीप्रकरणी गुन्हा दाखल

Indrajit Sawant : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा ठपका ठेवून जातीय तेढ,धार्मिक भावना,महापुरुषांचा अवमान आशा सहा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Rahul Gadkar

Kolhapur News : इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात संबंधित डॉ. प्रशांत कोरटकर नामक व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख देखील या व्हायरल ऑडिओ क्लिप च्या माध्यमातून करण्यात आला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाचे चौकशीचे आदेश पोलिसांना दिली आहेत.

दरम्यान, जुना राजवाडा पोलीस ठाण्यात इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी काही पुरावे सादर केले आहेत. त्यानुसार कोरटकर नामक व्यक्ती विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. यासंदर्भात 'सरकारनामा'ने सर्वप्रथम बातमी दिली होती. अखेर या बातमीची दखल घेत कोरटकर नामक व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीराजे यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याचा ठपका ठेवून जातीय तेढ,धार्मिक भावना,महापुरुषांचा अवमान आशा सहा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.झालेल्या घटनेबाबत इतिहासप्रेमी, संघटनांचे प्रमुख आणि इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित घटनेचे चौकशीचे आदेश पोलिसांना दिले होते.

त्यानुसार जुना राजवाडा पोलिसांनी इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांचा जबाब नोंदवून घेतला. यावेळी मला देण्यात आलेल्या धमकी पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबत आव्हान कारक वक्तव्याचा मी निषेध करतो. त्यामुळे या वक्तव्यावर कोरटकर नामक व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद करावा, अशी मागणी इंद्रजीत सावंत यांनी केली होती.

दरम्यान कोरटकर या नामक व्यक्तीने फोनवर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत मराठा समाजाबाबत चेतावणीखोर वक्तव्य केले होते. त्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र संताप उसळला आहे. ''कितीही मराठे एकत्र कर तुम्हाला ब्राह्मणांचा ताकद दाखवू, असे संभाषण या कॉल रेकॉर्डिंग मध्ये करण्यात आले होते. दरम्यान इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांच्याकडून देखील या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला होता.

तर समाजातील विविध स्तरातून याबाबत संताप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील, राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंतराव मुळीकांसह अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या संपूर्ण प्रकरणानंतर मात्र नागपूरमधील डॉ. प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजीत सावंत यांना आपण कॉल केला नाही. या घटनेची माझा काही संबंध नाही. सध्याचे कॉल रेकॉर्डिंग हे मॉर्फ करून व्हायरल करण्यात आली आहे, असे स्पष्टीकरण कोरटकर यांनी दिले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT