
Ratnagiri, 25 February : राजापूर मतदारसंघातून राजन साळवी यांना चारीमुंड्या चीत करत विधानसभेत पोचलेले किरण सामंत यांनी आज मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला आमदारकीची निवडणूक लढवायची नव्हती. मला खासदारकीची निवडणूक लढवायची होती. मला राज्यसभेची कमिटमेंट होती. राजापुरात राजन साळवी, रत्नागिरीतून उदय सामंत आमदार, तर मी खासदार असं ठरलं होतं, असे आमदार किरण सामंत यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजन साळवी (Rajan Salvi) हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नाराज होते. मात्र, त्यांच्या नाराजीची दखल घेतली गेली नाही, त्यामुळे राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्या उपस्थितीत आमदार किरण सामंत यांनी सर्व पत्ते ओपन केले आहेत.
आमदार किरण सामंत (Kiran Samant) म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या दिवसांपासून मी आणि उदय सामंत आम्ही दोघं माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे होतो. आपल्याला मुद्दाम सांगतो की, योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या बाबत माजी आमदार राजन साळवी हे हुशार आहेत. पण या वेळी त्यांनी तो घेतला नाही.
मी कधीच माझ्या मुलाची शपथ घेत नाही. पण, मी राजन साळवी यांच्याबाबत शपथ घेतली हेाती. तुम्ही शिंदे गटात प्रवेश करा. तुम्ही राजापूरमधून आमदार व्हा, उदय सामंत हे रत्नागिरीतून आमदार होतील आणि मी खासदार होईन, असं ठरलं होतं, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
किरण सामंत म्हणाले, मी राजन साळवी यांच्या घरी वेळावेळी जाऊन वहिनींना विनंती करत होतो राजन साळवींना आमच्यासोबत येऊ द्या. तुम्ही त्यांना साथ द्या. चांगल्या पद्धतीची शिवसेना घडवू. त्या वेळी राजन साळवी यांनी आमचं ऐकलं नाही.
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतरही मी राजन साळवी यांना विनंती केली होती की, तुम्ही आमच्यासोबत या. मला खरोखर आमदारकी लढवायची नव्हती. मला खासदारकीची निवडणूक लढवायची होती. मला राज्यसभेचा शब्द होता. त्यामुळे मी राजन साळवी यांना पक्षात प्रवेश करून निवडणूक लढविण्यासंदर्भात विनंती करत होतो. मात्र, त्यांनी ते ऐकले नाही. मी सध्या राजापूरचा आमदार असलो तरी तुम्हीच आमदार आहात, असेही किरण सामंत यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.