Devendra Fadnavis asudin obesi sarkarnama
महाराष्ट्र

BJP–AIMIM Alliance : भाजपची एमआयएम,-काँग्रेससोबत युती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'मला...'

Devendra Fadnavis BJP–AIMIM Alliance : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपने अकोटमध्ये एमआयएमसोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत केलेल्या युतीवर स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे.

Roshan More

Devendra Fadnavis News : महाराष्ट्राच्या राजकारण प्रथमच एमआयएम आणि भाजप युती झाली आहे. अकोट नगरपंयातीमध्ये स्थानिक आघाडीच्या माध्यमातून ही युती झाली आहे. उपनगराध्यक्षपदासाठी ही आघाडी मतदान करणार आहे.

अंबरनाथमध्ये देखील भाजप आणि काँग्रेस युती झाली आहे. सत्तेसाठी भाजप आपल्या कट्टर शत्रुंना देखील सोबत घेतो, अशी टीका होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची यावर प्रतिक्रिया समोर आली आहे.

एका मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस म्हणाले, 'मी स्पष्ट शब्दांत सांगतो काँग्रेस-एमआयएम सोबत कुठलीच युती चालणार नाही. ही युती तोडायलाच लागणार.'

'स्थानिक पातळीवर कोणी ही गोष्ट केली असेल तर ती चुकीचे आहे. हे गैरवर्तन आहे. ज्यांनी हा निर्णय घेतला असेल स्थानिक पातळीला त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्की.', असे देखील ते म्हणाले.

मी आदेश दिले...

राज्याच्या नेतृत्वाला विचार न घेता स्थानिक भाजप नेतृत्वाने अकोटमध्ये एमआयएमसोबत तर अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत युती केल्याचे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर स्पष्ट झाले आहे. दरम्यान, ज्यांनी या आघाडीचा निर्णय घेतला त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मी दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT