Uddhav Thackeray, Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : "मी म्हणजे उद्धव ठाकरे नाही;" स्थगितीच्या बातम्यांवरून फडणवीसांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांना स्थगिती दिल्याच्या बातम्यांवरून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Hrishikesh Nalagune

Devendra Fadnavis : "सगळ्या निर्णयांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही," अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयांना स्थगिती दिल्याच्या बातम्यांवरून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर दिले. यावेळी त्यांनी माध्यमांनाही जबाबदारीने बातम्या द्याव्यात असा सल्लाही दिला.

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना मंजूर केलेल्या प्रकल्पांना आणि घेतलेल्या निर्णयांना स्थगिती देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सतत टीका होत होती. यावर त्यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना प्रत्युत्तर दिले.

फडणवीस म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्यासोबत मी आणि अजित पवारही होतो. त्यामुळे घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी केवळ एकनाथ शिंदे यांची नाही. ती आमच्या तिघांचीही आहे. ज्या ठिकाणी खालच्या स्तरावर गडबड झाल्याचे आढळले आहे त्या त्या ठिकाणी चर्चा करूनच स्थगिती देण्यात आली आहे.

माध्यमांनी जबाबदारीने बातम्या द्याव्यात :

विभागीय आयुक्तांनी त्यांच्या स्तरावर स्थगिती दिली तरी माध्यमांमध्ये बातम्या येतात फडणवीस यांचा दणका. खात्याच्या मंत्र्याने केंद्र शासनाच्या निर्देशांनुसार स्थगिती दिली तरी फडणवीस यांचा दणका. पण हे समन्वयाने चालणारे सरकार आहे. आम्ही तिघांनी घेतलेले हे निर्णय आहेत.

आणखी एक बातमी असते ती म्हणजे अजितदादा नाराज, शिंदे नाराज. काही बैठकांना शिंदे आणि अजितदादा दोघेही असतात. काही बैठकांना दोघांपैकी एक जण उपस्थित असतो. त्यावेळी जो जो नसतो तो नाराज अशा बातम्या असतात.

मला असं वाटतं की क्वालिटीच्या बातम्या माध्यमांनाही सापडत नाहीत आणि विरोधकांनाही क्वालिटीच्या टीका करता येत नाहीत. त्यामुळे माध्यमांनी जबाबदारी बातम्या द्याव्यात असा सल्लाही यावेळी फडणवीस यांनी माध्यमांना दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT