Devendra Fadnavis Politics : देवेंद्र फडणवीसच 'बाॅस'; अजितदादा, एकनाथ शिंदेंचे एक पाऊल मागे!

Devendra Fadnavis Emerges as the Real Power Center :देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर महायुतीमधील मित्र पक्षांच्या आमदारांना स्पष्ट केले होते की, तुमच्या पाठींब्याशिवाय देखील सरकार चालू शकते. त्यामुळे मस्त करू नका.
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाले. 288 जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत महायुतीचे तब्बल 237 आमदार आहे. यामध्ये त्यांना अपक्षांचा देखील पाठींबा आहे. विशेष म्हणजे भाजपला सर्वाधिक 132 जागा मिळाल्या आहेत. तर, शिवसेना 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतल्यानंतर महायुतीमधील मित्र पक्षांच्या आमदारांना स्पष्ट केले होते की, तुमच्या पाठींब्याशिवाय देखील सरकार चालू शकते. त्यामुळे मस्त करू नका. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनीच हे जाहीर कार्यक्रमात सांगितले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वारंवार मला हलक्यात घेऊ नका, असे म्हणत होते. त्यांची ही टीका उद्धव ठाकरेंसाठी की देवेंद्र फडणवीसांसाठी होती, याची चर्चा सुरू होती.

देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना झालेले काही निर्णय फिरवण्यास सुरुवाते केली आहे. एसटी खरेदीच्या निर्णयाला त्यांनी स्थगिती दिली. त्यानंतर आरोग्य खात्यामधील कंत्राटी साफसफाईच्या कामाला देखील रोखले. भ्रष्टाचाराऱ्याची शक्यता गृहीत धरूनच ही कारवाई केली गेली.मात्र, एकनाथ शिंदे यांचे निर्णय फिरवल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, फडणवीसांनी नाराजीची चिंता केली नाही. त्यामुळे सरकारमध्ये आपण बाॅस असल्याचे ते दाखवून देत आहे.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Hasan Mushrif : परक्या जिल्ह्यात जीव न रमलेले 'मुश्रीफ' एकटेच नाहीत... डझनभर मंत्री करतायत 'जुलमाचा राम राम'

धनंजय मुडेंच्या निमित्ताने दणका

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. अजित पवारांनी देखील राजीनाम्या देण्यासंदर्भात धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, मुंडे राजीनामा देण्यास तयार नव्हते. अखेर धनंजय मुंडे यांना बडतर्फ करण्याचा इशारा दिल्याने त्यांनी आरोग्याचे कारण सांगत राजीनामा दिला. फडणवीस यांच्या इशाऱ्यामुळे ते कोणाचीही मुलाहिजा ठेवणार नसल्याचे दिसून येते आहे.

एकनाथ शिंदेंचे एक पाऊल मागे

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रि‍पदावरून हुलकावणी दिल्यानंतर ते नाराज होते. त्यातच भाजपच्या वरिष्ठांशी बोलून काही होते का याची चाचपणी ते शेवटपर्यंत करत होते. उपमुख्यमंत्रिपद त्यांनी नाराजीनेच स्वीकारले. मात्र, देवेंद्र फडणीस यांनी शिंदेंच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयांवर स्थगिती दिल्याने त्यांच्या नाराजीत भरच पडली. मात्र, धनंजय मुडेंच्या बाबत कठोर निर्णय घेत फडणवीसांनी दाखवून दिले की त्यांच्या मंत्रिमंडळात ते कुठलाही गैरप्रकार खपवून घेणार नाहीत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचाच शब्द शेवट असेल. त्यामुळे नाराज शिंदेंना एक पाऊल मागे आल्याशिवाय पर्याय राहिला नाही.

Ajit Pawar, Devendra Fadnavis, Eknath Shinde
Ambadas Danve On Devendra Fadnavis News : मुख्यमंत्री अन् त्यांच्या पक्षाला पन्नास वर्षापूर्वी इहलोक सोडून गेलेल्या नेहरूंचा आधार बचावासाठी का घ्यावा लागतो?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com