Devendra Fadnavis sarkarnama
महाराष्ट्र

Devendra Fadnavis यांच्या चाळणीत 16 अधिकारी सापडले फिक्सर; 109 जण पास

Devendra Fadnavis news : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनासाठी कमालीचे आग्रही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही फडणवीस यांना त्याबाबतचे स्पष्ट निर्देश आहेत.

Hrishikesh Nalagune

Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वच्छ आणि पारदर्शी प्रशासनासाठी कमालीचे आग्रही आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही फडणवीस यांना त्याबाबतचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुसारच फडणवीस काम करत असल्याचे दिसून येत आहेत. त्यातूनच पीएस आणि ओसडी नेमण्यासाठी सर्व मंत्र्यांनी पाठवलेल्या 125 अधिकाऱ्यांच्या नावांपैकी तब्बल 16 अधिकाऱ्यांच्या नावावर त्यांनी फुली मारली आहे. हे अधिकारी फिक्सर असल्याचे फडणवीस यांना आढळून आले आहे.

कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांनी सोमवारी एका कार्यक्रमात बोलताना "आमचे पीएस आणि ओएसडी देखील मुख्यमंत्रीच ठरवतात. आमच्या हातात काही राहिलेले नाही, अशी हतबलता बोलून दाखविली होती. त्यावर "कोकाटे यांना माहिती नसेल की पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचाच असतो. मंत्र्यांनी फक्त नावे पाठवायची असतात", अशा शेलक्या शब्दात फडणवीस यांनी कोकाटे यांना झापले.

फडणवीस पुढे म्हणाले, मी मंत्रिमंडळ बैठकीतच सर्व मंत्र्यांना सांगितले होते की पीएस आणि ओएसडी म्हणून तुम्हाला जे अधिकारी हवे आहेत, त्यांची नावे पाठवा. पण फिक्सर म्हणून ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्या नावांना मान्यता देणार नाही. त्यानुसार माझ्याकडे 125 च्या जवळपास नावे आली आहेत. त्यातील मी 109 नावे क्लिअर केली आहेत.

फिक्सर असलेले लोक मंत्रालयात नको, म्हणून उर्वरित 16 नावांना मान्यता दिलेली नाही. कारण कोणता न कोणता आरोप त्यांच्यावर आहे. तसेच कोणती न कोणती चौकशी त्यांच्यावर सुरू आहे. त्यामुळे कोणी नाराज झाले तरीही मी अशा नावांना मान्यता देणार नाही, असेही फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले.

इतकेच नाही तर ज्या 109 नावांना मंजूरी देण्यात आली आहे ते पीए, पीएस आणि ओएसडी देखील पाच वर्षे राहतीलच असे नाही, त्यांच्याविषयी काही तक्रारी आल्या आणि त्यात तथ्य आढळले तर त्यांना मध्येच घरी बसावे लागेल असा इशाराही देण्यात आला आहे.

हे अधिकारी कसे काम करतात? काही चुकीचे निर्णय घेतात का? पारदर्शक कारभार करतात की नाही, यावर मुख्यमंत्री कार्यालयाची बारीक नजर असणार आहे. या सर्व अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेतला जाणार आहे. जे कुठेही काही गडबड करतील त्यांना पद मुक्त केले जाईल.

उसनवारीलाही चाप लागणार :

काही मंत्रालयांमध्ये सध्या उसने घेतलेले अधिकारी कार्यरत आहेत. एका मंत्रालयात नियुक्ती असलेले अधिकारी दुसऱ्या मंत्रालयात घ्यायचे पण त्यांचा पगार मात्र मूळ विभागातूनच निघेल अशीही उसन्या अधिकाऱ्यांची पद्धत आहे. या पद्धतीत काही मंत्रालयात 20 ते 25 अधिकारी कार्यरत असल्याची माहिती आहे. त्यातील बहुतेक अधिकारी गडबड करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता अशा उसने कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांची यादीच मुख्यमंत्री कार्यालयाने मागविली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT