Devendra Fadnavis : माणिकराव कोकाटेंना मुख्यमंत्री फडणवीसांनी खडसावले; म्हणाले, 'तो माझा...'

Devendra Fadnavis Slams Manikrao Kokate : नीलम गोऱ्हेंनी उद्धव ठाकरेंविषयी केलेल्या वक्तव्याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हटले की बोलताना मर्यादा पाळायला हव्यात.
Devendra Fadnavis Manikrao Kokate
Devendra Fadnavis Manikrao Kokatesarkarnama
Published on
Updated on

Devendra Fadnavis News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसच आमचे पीए,ओएसडीसुद्धा ठरवतात.त्यामुळे आता आमच्या पण हातात काहीच राहिलेलं नाही, असे सांगितले. त्यामुळे महायुतीमधील मंत्र्यांना काहीच अधिकार नसल्याची चर्चा सुरू झाली. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरं काय ते सांगितले.

पत्रकारांनी माणिकराव कोकाटे जे बोलले त्या विषयी फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, माणिकराव कोकाटेंना हे माहीत हवे की मंत्र्यांचे पीए, ओएसडी नेमण्याचा अधिकार हे मुख्यमंत्र्यांनाच असतात. मंत्र्यांनी प्रस्ताव पाठवायचा असतो. फिक्सर असलेले लोकं मंत्रालयात नको म्हणून माझ्याकडे आलेल्या 125 जणांच्या प्रस्तावापैकी मी 109 जणांच्या नावाला मंजुरी दिली आहे.

Devendra Fadnavis Manikrao Kokate
Neelam Gorhe : "मर्यादा पाळाव्यात..."; CM फडणवीसांनी नाव न घेता टोचले गोऱ्हेंचे कान

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी कॅबिनेटमध्ये सांगितले होते तुम्हाला पाहिजे ती नावे पाठवा. पण फिक्सर म्हणून ज्यांच्या नावांची चर्चा आहे त्यांच्या नावांना मान्यता देणार नाही. कोणीही नाराज झाले तर मी त्याला मान्यता देणार नाही.

...मर्यादा पाळाव्यात

दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी दोन मर्सिडीज घेतल्यानंतर उद्धव ठाकरे पद देतात, असे म्हटले आहे. त्यावरून गोऱ्हे यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. गोऱ्हेंच्या वक्तव्याविषयी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता ते म्हटले की बोलताना मर्यादा पाळायला हव्यात.

Devendra Fadnavis Manikrao Kokate
Delhi CM Rekha Gupta : अखेर रेखा गुप्तांनी आंबेडकर आणि भगतसिंग यांचे फोटो हटवले; जोरदार हंगामा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com