Devendra Fadnavis-Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Eknath Shinde : सीएम फडणवीस अजितदादांनंतर आता शिंदेंना देणार 'हे' गिफ्ट; नियमात करणार बदल

CM Fadnavis gift to Shinde news : काही निर्णयांना स्थगिती देत त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा सातत्याने सुरु असताना आता हे चित्र बदलत असल्याचे दिसू लागले आहे.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : राज्यात सत्तेत आलेल्या महायुतीमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे चित्र सुरुवातीच्या काळात दिसत नव्हते. मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटप, पालकमंत्र्याची नावे व मंत्र्याची बंगले यावरून महायुतीमधील तीन घटक पक्षात रस्सीखेच पाहावयास मिळाली. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. शिंदेंनी मुख्यमंत्री असताना घेतलेले काही निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फिरवले आहेत, तर काही निर्णयांना स्थगिती देत त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये शीतयुद्ध सुरु असल्याच्या चर्चा सातत्याने सुरु असताना आता हे चित्र बदलत असल्याचे दिसू लागले आहे.

सीएम देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दोन दिवसापूर्वीच अजित पवार यांच्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्र्रवादी काँग्रेसला देत मोठे गिफ्ट दिले आहे. तर दुसरीकडे राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी असलेल्या समितीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना स्थान देण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे.

यापूर्वी समितीत मुख्यमंत्री आणि अर्थ आणि गृह खात्याचा पदभार असलेल्या उपमुख्यमंत्र्यांचा समावेश केला जातो. एकनाथ शिंदेंकडे (Ekanth Shinde) अर्थ किंवा गृह मंत्रालय नाही. त्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठीच्या समितीत शिंदे यांचा समावेश केला जाऊ शकत नव्हता. पण शिंदे यांना समितीत स्थान देता यावे यासाठी नियमांमध्ये, निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे समितीचं प्रमुखपद असेल, तर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे समितीचे उपसंचालकपद असणार आहे.

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण समितीत शिंदेंचा समावेश

गेल्याच महिन्यात महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या समितीमधून पाच महिन्यांपूर्वी शिंदे यांचं नाव वगळण्यात आले होते. उपमुख्यमंत्री शिंदेंचा समावेश करण्यासाठी नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या होत्या. या समितीतून या समितीत मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा समावेश होता. अजित पवारांकडे अर्थ मंत्रालय असल्यानं त्यांना या समितीत स्थान देण्यात आले आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT