Devendra Fadnavis, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti Politics: CM फडणवीस एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मोठा धक्का देणार, 'ही' गाजलेली योजना लवकरच गुंडाळणार..?

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली लाडकी बहीण योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागत आहे. याचाच फटका इतर लहान-लहान योजनांना बसल्याचं दिसून येत आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: महाराष्ट्र विधिमंडळाचं दोन दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारी (ता.23) सुरू झाले. या अधिवेशनाच्या तोंडावरच एक महत्त्वाची राजकीय अपडेट समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का देणार असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा भाजप अन् शिवसेनेत तणाव निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

एकनाथ शिंदे यांनी महायुती सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात सुरू झालेल्या आणखी एका लोकप्रिय योजनेला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. यामुळे एकनाथ शिंदेंसोबतच ज्येष्ठ नागरिकांनाही धक्का मानला जात आहे. शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन' योजनेला कात्री लागण्याची शक्यता आहे.

महायुती सरकारच्या दुसर्‍या टर्ममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार एकापाठोपाठ एक धडाकेबाज निर्णय घेतले जात आहेत. त्यात राज्य सरकारनं एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या विविध महत्त्वाकांशी योजनाही बंद करण्याचा निर्णय घेतल्याचं समोर आलं होतं. त्यात आणखी एका योजनेची भर पडली आहे.

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कार्यकाळात ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेली तीर्थ दर्शन यात्रा ही योजना राज्य सरकार बंद करण्याच्या उंबरठ्यावर आहेत. यापूर्वी सरकारनं माझी शाळा, आनंददायी शाळा, आनंदाचा शिधा यांसारख्या अनेक लोकप्रिय योजना निधीअभावी गुंडाळल्याची चर्चा आहे. यानंतर आता आणखी एक योजना बंद करण्यात येत असल्याचं समोर आल्यामुळे महायुतीत खटके उडण्याची शक्यता आहे.

एकापाठोपाठ एक योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्यामुळे पुन्हा एकदा महायुतीत सारंकाही आलबेल नसल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. राज्य सरकारकडून शिंदेंना धक्का देण्यासाठीच योजना बंद करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांसह शिवसेनेच्या काही नेत्यांनीही केल्याचं दिसून आलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात सुरू झालेली लाडकी बहीण योजनेसाठी मोठी आर्थिक तरतूद करावी लागत आहे. याचाच फटका इतर लहान-लहान योजनांना बसल्याचं दिसून येत आहे. लाडकी बहीण, आनंदाचा शिधा यानंतर तीर्थ दर्शन योजनाही चांगलीच चर्चेत आली होती. ही योजना ज्येष्ठ नागरिकांच्या प्रचंड पसंतीस उतरली होती.

मुख्यमंत्री तीर्थ योजनेचे राज्यातील विविध जिल्ह्यातून ज्येष्ठ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त झाले होते. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात तीर्थ दर्शन योजनेबाबतची धक्कादायक अपडेट समोर आली आहे.

एकूण प्राप्त झालेल्या 5 हजार 722 अर्जांपैकी अवघ्या 929 अर्जांनाच मंजुरी मिळाल्याची माहिती समोर येत आहे. तर तब्बल 4 हजार 793 अर्ज अजूनही मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचं समोर येत आहेत.यामुळे राज्य सरकार कुठेतरी तीर्थ दर्शन योजनाही गुंडाळण्याच्या विचारात तर नाही ना अशी शंका उपस्थित केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT