Nagpur Police Bust Interstate Extortion Racket Targeting Sarpanches in 8 States Sarkarnama
महाराष्ट्र

Woman Sarpanch news : महिला सरपंचाची थेट CM फडणवीसांकडे तक्रार; जागेवरून आदेश अन् खंडणीखोर टोळीच्या आवळल्या मुसक्या

Devendra Fadnavis, Nagpur News, Sarpanch Complaint, Extortion Racket : पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, आठ राज्यांतील हजारो सरपंचांना या टोळीकडून टार्गेट केले जात होते. सरपंच मीना सूर्यवंशी यांना ११ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर या काळात एका महिलेकडून फोन करण्यात आले होते.

Rajanand More

Maharashtra News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली होती. यावेळी त्यांनी एका गावात मुक्काम करून स्थानिक लोकप्रतिनिधींनी संवाद साधला होता. यादरम्यान महिला सरपंचांनी आपल्याला खंडणीचे फोन येत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्‍यांकडे केली होती. त्यावर त्यांनी लगेच पोलीस अधिक्षकांना कारवाईचे आदेश दिले अन् आठवडाभरातच आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस हे दिवाळीत नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा येथे एका शेतकऱ्याच्या घरी मुक्कामी राहिले होते. स्थानिकांशी संवादादरम्यान तेथील महिला सरपंचांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे ‘श्रेष्ठ न्यूज़’च्या नावाने येणाऱ्या धमकीच्या फोनबाबत तक्रार केली होती.

तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानुसार, नागपूर ग्रामीण पोलीस, क्राइम ब्रँच व सायबर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत भोपाळमधील 3 बेकायदेशीर कॉल सेंटर्सचा पर्दाफाश केला आणि या प्रकरणातील 4 मुख्य महिला आरोपींना अटक केली असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, याबाबत पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले की, आठ राज्यांतील हजारो सरपंचांना या टोळीकडून टार्गेट केले जात होते. सरपंच मीना सूर्यवंशी यांना ११ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर या काळात एका महिलेकडून फोन करण्यात आले होते. दैनिक श्रेष्ठ न्यूची प्रतिनिधी असल्याचे सांगून जाहिरातीसाठी तीन हजारांची मागणी करण्यात आली होती. त्यासाठी क्यूआर कोडही दिला होता. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर बदानामी करणारी बातमी छापण्याची धमकी देण्यात आली होती.

त्याचप्रमाणे सरपंच प्रभा गोतमारे यांच्याकडून फसवणूक करून ऑनलाईन ५०० रुपये घेण्यात आले. पोलिसांनी मोबाईल क्रमांक आणि तांत्रिक बाबींच्या आधारे भोपाळमधील तीन कॉल सेंटरवर छापे टाकले. यातीन ठिकाणी ३५ महिला कर्मचारी आढळून आल्या. आरोपींनी महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांतील सरपंच आणि ग्रामसेवकांना फोन केल्याचे तपासात उघड झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT