CM Devendra Fadnavis And sharad pawar Sarkarnama
महाराष्ट्र

CM Devendra Fadnavis : शरद पवार यांच्या माजी आमदाराला मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले एअरलिफ्ट

Prakash Gajbhiye was airlifted by CM : शरचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि एकेकाळचे रिपाई नेते प्रकाश गजभिये यांना विशेष विमानाने श्रीनगर येथून मुंबई येथील लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतच असतात. आंदोलनादरम्यान नेते एकमेकांवर तुटून पडतात. आपआपल्या पक्षाची भूमिका मांडताना वैयक्तिक टीकाटीपणीसुद्धा केली जाते. मात्र त्यानंतरही आपसातील मतभेद विसरून व मैत्री जपणाची राजकीय परंपरा महाराष्ट्रात कायम आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. शरचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आणि एकेकाळचे रिपाई नेते प्रकाश गजभिये यांना मुख्यमंत्र्यांनी विशेष विमानाने श्रीनगर येथून मुंबई येथे आणून लीलावती रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहेत.

प्रकाश गजभिये कुटुंबासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. बर्फावरून पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर जखम झाली. त्यांना तातडीने जम्मू येथील एम्स इस्पितळात दाखल करण्यात आले होते. ते कोमात गेले होते. त्यामुळे सर्वांची धाकधूक वाढली होती. त्यांना तातडीने दिल्लीला हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. नंतर त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने हा निर्णय रद्द करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही बाब कळताच त्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबीयांसोबत संपर्क साधला. त्यांचा एम्स रुग्णालयाचा वैद्यकीय खर्च भरून त्यांना विशेष विमानाने मुंबईला आणले आणि लीलावती रुग्णालयात भर्ती केले आहे. त्यांचा दिल्ली ते मुंबई खाजगी विमानाचा 20 लाखांचा खर्च देखील राज्य शासनाने केला. याबाबत प्रकाश गजभिये यांनी राजकारणाच्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्री फडणवीस जपल्याने त्यांचे आभार मानले आहे.

देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश गजभिये हे पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात राहतात. महापालिकेच्या राजकारणापासून त्यांची मैत्री आहे. फडणवीस नागपूरचे महापौर असताना गजभिये हे सुद्धा रिपाईचे नगरसेवक होते. ते विरोधीपक्षनेते सुद्धा होते. भाजप आणि रिपाई यांची विचारधारा वेगवेगळी असली तरी दोघांनी त्या पलीकडे जाऊन मैत्री जपली आहे. केंद्रीयमंत्री रामदास आठवले हे महायुतीत सहभागी झाल्यानंतरही प्रकाश गजभिये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कायम राहिले. शरद पवार यांनी त्यांना विधान परिषदेचे सदस्य केले होते.

दक्षिण भारतातील राजकीय नेते एकमेकांसमोर शत्रू समजतात. एकमेकांशी बोलणे सोडा, आमोरासमोरही उभे राहात नाही. महाराष्ट्राही ही संस्कृती फोफावत चाचल्याने मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यावर चिंता व्यक्त केली होती. हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते. मुख्यमंत्र्यांच्या दालनात दोघांनी सुमारे वीस मिनिटे आपसात चर्चा केली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आमचे विरोधक आहे परंतु शत्रू नाही असे सांगून महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाचा परिचय दिला होता. सोबतच आपसातील वैर मिटवण्यासाठी स्वतःपासून सुरुवात केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT