Mumbai News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. यात सहा महत्त्वाचे निर्णय घेतले. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने सहावा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. पण याच बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आपल्याच मंत्र्यांवर भडकले. त्यांनी यावेळी मंत्र्याना थेट कारवाईचाच इशारा दिला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी (ता.18) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपल्याच मंत्र्यांवर संताप व्यक्त केला.तसेच मंत्रिमंडळ बैठकीपूर्वीच (Cabinet Meeting) बैठकीतला अजेंडा बाहेर येण्यावरुन फडणवीसांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी याप्रकाराची गंभीर दखल घेतली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,आमच्या सरकारच्या मंत्रिमंडळ बैठक होण्यापूर्वीच त्यामधील अजेंडा छापणं किंवा समोर येणं हे अत्यंत चुकीचे आहे.बैठक होण्यापूर्वी काही लोक अजेंडा छापत असून मी याविषयी सहकारी मंत्र्यांनाही सांगितले आहे.मंत्र्यांनी आपल्या संबधित कार्यालयांना बैठकीपूर्वी अजेंडा न छापण्याबाबत सांगायला हवं. हे जर थांबलं नाही तर, मला मला कारवाई करावी लागेल, असा सज्जड दमही भरला.
तसेच संबंधित विभागासह मंत्र्यांची पण कानउघडणी केली. ते म्हणाले,आपण गुप्ततेची शपथ का घेतो. मंत्रिमंडळाच्या बैठकीतला सरकारचा अजेंडा हा गुप्त असतो. त्या गुप्ततेची शपथ आपण घेतली आहे. तसेच माध्यमांनी सुद्धा आपल्या खपासाठी आणि टीआरपीसाठी नियम मोडू नये,अशी सूचनाही मीडियाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्रपणे सुरू केलेल्या वैद्यकीय कक्षावरही रोखठोक भाष्य केलं. ते म्हणाले,उपमुख्यमंत्री असताना मी पण वैद्यकीय कक्ष चालवत होतो. त्यामुळे शिंदेंनी वैद्यकीय कक्ष सुरू करणे चुकीचे काही नाही. उपमुख्यमंत्र्यांनी सुरु केलेल्या वैद्यकीय कक्षात काहीही गैर नाही, अशी भूमिका यावेळी फडणवीसांनी मांडली.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. या बैठकीत 6 मोठे व तितक्याच महत्त्वाच्या निर्णयांना मान्यता देण्यात आली. सहाव्या राज्य वित्त आयोगाची स्थापन करण्यास मान्यता, अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी (एएनटीएफ) एकूण 346 नवीन पदे, ) कृष्णा-कोयना उपसा सिंचन योजनेतील म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यास तसेच योजनेची ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1594.09 कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता, जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाला 1275.78 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता यांसारख्या प्रमुख निर्णयांचा समावेश आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.