Vishwas Nangare Patil
Vishwas Nangare Patil sarkarnama
महाराष्ट्र

नांगरे पाटील अडचणीत ; सोमय्यांच्या तक्रारीचा मानवधिकार आयोग अहवाल मागविणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्यांनी सरकारी अधिकाऱ्याविरोधात राष्ट्रीय मानवधिकार आयोगाकडे तक्रार केली असेल तर याबाबत राज्य सरकारकडे विचारणा करुन त्याबाबतचा अहवाल मागविला जाईल, अशी माहिती आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे. बेकायदा घरात डांबून ठेवल्या प्रकरणी मुंबई पोलिस दलातील सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांच्याविरोधात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर सोमय्या कोल्हापूरला येत होते. त्या दिवशी त्यांना बेकायदा घरात डांबून ठेवून ठेवले. तसेच रेल्वेत बसण्यास पोलिसांनी मज्जाव केला होता.याविरोधात किरीट सोमय्या यांनी पोलिस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रीय मानवाधिकारी आयोगाकडे तक्रार दाखल केली.

तीन दिवसांपूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या पदाचा गैरवापर केला असून, नांगरे-पाटील महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करीत आहेत, त्यांनी सहा तास घरात कोंडून ठेवल्याचा आरोप केला होता. यासंदर्भात सोमय्या यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूरला जात असताना मला मुंबईतच रोखण्यात आले व घरात डांबून ठेवण्यात आले. घोटाळेबाजांना वाचवण्यासाठी नांगरे पाटील यांनी पदाचा गैरवापर केला.

''किरीट सोमय्या यांची तक्रार अद्याप माझ्याकडे आलेली नाही. माझ्याशिवाय ती अन्य सदस्यांकडे येऊ शकते; परंतु शासकीय अधिकाऱ्यांसंदर्भातील ही तक्रार असल्याने महाराष्ट्र सरकारला या प्रकरणात काय कारवाई झाली याबाबत अहवाल मागितला जाईल. त्यानंतर ते प्रकरण आयोग हाताळेल,डॉ. ज्ञानेश्वर मुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT