सोमय्यांचा गैाप्यस्फोट ; भष्ट्राचारी 'ठाकरे सरकार इलेव्हन''ची यादी वाढणार

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) म्हणाले, ''ठाकरे सरकारमधील भष्ट्राचारी ११ नेत्यांची यादी जाहीर केली होती.पुढच्या महिन्यात ही संख्या वीस होणार आहे. त्यानंतर मग ठाकरे सरकारचे (Uddhav Thackeray) काही खरं नाही.''
Kirit Somaiya, Uddhav Thackeray
Kirit Somaiya, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची ठाकरे सरकारमधील (Uddhav Thackeray) मंत्र्यांवरील आरोपांची मालिका सुरुच आहे. किरीट सोमय्यांनी काही दिवसापूर्वी टि्वट करीत ठाकरे सरकारमधील भष्ट्राचारी ११ नेत्यांची यादी जाहीर केली होती त्यानंतर या यादीत आणखी वाढ होणार असल्याचे संकेत सोमय्यांनी दिले आहेत. सोमय्या आज एका कार्यक्रमात बोलत होते.

सोमय्या यांची काही दिवसापूर्वी शिवसेनेवर आरोप करीत टि्वट केलं होतं. यात त्यांनी ''ठाकरे सरकारची महान इलेव्हन'' असं लिहीत त्यांनी ११ जणांची नावं जाहीर केली आहेत. प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवळी, महापौर किशोरी पेडणेकर, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर यांची नावे लिहिली आहेत. आजच्या कार्यक्रमात सोमय्या म्हणाले, ''यापूर्वी जाहीर केलेल्या यादीत १४ नावे झाली असून पुढच्या महिन्यात ही संख्या वीस होणार आहे. त्यानंतर मग ठाकरे सरकारचे काही खरं नाही.''

Kirit Somaiya, Uddhav Thackeray
निवृत्तीच्या दिवशी IPS अधिकाऱ्याने परिधान केली राजीव गांधींच्या रक्ताने माखलेली टोपी

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी अनिल परब यांच्याविरोधात मोहीम उघडली आहे. त्यांचे रत्नागिरीतील रिसाॅर्ट असो की मुंबईतील म्हाडा इमारतीतील बांधकाम असो, यावर सोमय्या यांनी तक्रारी करत परब यांना घेरले आहे. परब यांच्याविरोधात ईडीची देखील कारवाई सुरू आहे. त्यांची ईडीने सुमारे आठ तास चौकशी केली. या साऱ्या वादात कदम यांची भूमिका काय याचा उलगडा आॅडिओ क्लिपमधून पुढे आला आहे. या क्लिपच्या दाव्याच्या आधारे परब यांच्याविरोधातील माहिती कदम यांनीच पुरविल्याचा दावा करण्यता आला आहे. अर्थात हा दावा मनसेने केला आहे.अनिल परब यांच्याविरोधातील सारी माहिती रामदास कदम यांनी दिल्याचा आरोप माजी आमदार संजय कदम आणि मनसे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी केला आहे.

आजच्या कार्यक्रमात सोमय्या म्हणाले, ''शिवसेनेच्या आजी मंत्र्यांच्या घोटाळ्याची माहिती माजी मंत्री देतो तर शिवसेनेच्या आजी मुख्यमंत्र्यांच्या १९ बंगल्याच्या घोटाळ्याची माहिती शिवसेनेच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिली.'' या विधानात त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी ही माहिती दिली असल्याचे नकळत सांगितले.

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांनीच पुरवल्याचा आरोप खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला. या आरोपांच्या पुष्टीसाठी कदम आणि सोमय्या यांच्यातील दूरभाष संवादाची ध्वनिफीतही ऐकवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com