Highcourt Manoj jarange  Sarkarnama
महाराष्ट्र

Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या 'त्या' वक्तव्याविरोधात न्यायालयात तक्रार, पुराव्यासह न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश

Complaint Filed Against Manoj Jarange : मंगळवेढ्यात मनोज जरांगेंनी केलेले वक्तव्या दोन समाजामध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा हेतू असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे.

Jagdish Pansare

Manoj jarange Patil News: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवेढ्यात (जि. सोलापूर) एका जातीसमुहाविषयी वक्तव्य केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायालयात फौजदारी पुनरिक्षण अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावरील सुनावणीवेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश महेश तिवारी यांनी या प्रकरणातील तक्रारीची कार्यवाही पुढे सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे नमूद करत तक्रारदाराला पुराव्यासह न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

याप्रकरणी ॲड. रत्नाकर चौरे यांनी पार्टी इन पर्सन अंतर्गत वरीलप्रमाणे अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जात राज्य शासन आणि मनोज जरांगे पाटील यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार मनोज जरांगे यांनी ११ फेब्रुवारी रोजी मंगळवेढ्यात केलेल्या भाषणादरम्यान एका जाती समुहाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले.

यातून दोन समाजामध्ये वैमनस्य निर्माण करण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला .याप्रकरणी १८ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथील एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. मात्र, संबंधित तक्रारीवर पोलिसांनी प्रतिवादीविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. त्यानंतर पोलीस आयुक्तालयातही तक्रार देण्यात आली.

मात्र, तेथूनही काही कार्यवाही झाली नसल्याने न्यायालयात केलेला अर्ज १३ एप्रिल रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी क्षेत्राधिकारा बाहेरील पोलिसांना तपासाचे निर्देश देण्याचा अधिकार मिळत नसल्याचे निरीक्षण नोंदवत अर्ज निकाली काढण्यात आला. त्याला अतिरिक्त सत्र न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT