Jalna News: माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे अडचणीत, जालन्यातील वादग्रस्त वक्तव्यावरून गुन्हा दाखल

Former minister Laxman Dhoble faces an FIR: जालना येथे मातंग समाजाच्या सभेतील कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. सीसीटीव्ही आणि व्हायरल रेकॉर्डिंगच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली.
Laxman Dhoble faces an FIR over alleged objectionable remarks
Laxman Dhoble faces an FIR over alleged objectionable remarksSarkarnama
Published on
Updated on

FIR Against Laxman Dhoble: माजी मंत्री तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष लक्ष्मण ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग समाजाच्या वतीने आयोजित मोर्चात महिलांबाबत आणि इतर समाजावर ढोबळे यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून ढोबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वजिराबाद पोलीस ठाण्यात २१ सप्टेंबर रोजी हा गुन्हा नोंदवण्यात आला.

आरक्षण वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून १३ सप्टेंबर रोजी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मातंग समाजाच्या वतीने मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतील भाषणादरम्यान माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी महिलांबाबत तसेच दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर सामाजिक स्तरावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली सुरेश गायकवाड यांनी या प्रकरणी तातडीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेत, संबंधित भाषणाचे रेकॉर्डिंग तपासून गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी प्रशासनाकडे लावून धरली होती. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३(२) आणि १९६ अंतर्गत ढोबळेवर कारवाई केली आहे.

Laxman Dhoble faces an FIR over alleged objectionable remarks
Ketan Agarwal Case: केतन अग्रवाल हत्या प्रकरणी 5 हजार पानांच्या दोषारोपपत्रातून पोलिसांचे धक्कादायक खुलासे : फेक अकाऊंट, सिनेमा अन् सोनम प्रकरण...

सीसीटीव्ही फुटेज आणि व्हायरल रेकॉर्डिंगचा आधार

वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणात प्राप्त झालेले सीसीटीव्ही फुटेज तसेच सोशल मीडियावर व्हायरल झालेले रेकॉर्डिंग तपासून गुन्हा नोंदवला आहे. घटनेच्या ९ दिवसांनंतर गुन्हा दाखल झाल्याने या विलंबावरही आता चर्चा सुरू झाली आहे.

Laxman Dhoble faces an FIR over alleged objectionable remarks
BJP MLA News : MPSC पेपरफुटी प्रकरणात भाजप आमदाराची बदनामी भोवली : कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर पोलिसांची तातडीने अ‍ॅक्शन

याबाबत बोलताना फिर्यादी व सामाजिक कार्यकर्त्या अंजली गायकवाड म्हणाल्या की, त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे सातत्याने या घटनेचा पाठपुरावा केल्यानंतर रेकॉर्डिंगची शहानिशा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पुढील तपास वजिराबाद पोलीस ठाण्याकडून सुरू असून, आगामी काळात याबाबत अधिक कारवाई होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com