Nana Patole, balasaheb thorat, vijay vaddetivar, ramesh chennithla, Pruthvairaj chavan  Sarkarnama
महाराष्ट्र

Congress News : काँग्रेसही मागे नाही तेवढेच दमदार पाऊल उचलणार; खास भाजपसाठी प्रवक्त्यांची नवी यादी जाहीर करणार

Sachin Waghmare

Mumbai Congress : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आतापासूनच संघटनात्मक दृष्टीने तयारी सुरु केली आहे. येत्या काळात प्रचार काय करायचा यासंबंधी सुद्धा स्ट्रॅटर्जी आखली जात आहे. शुक्रवारच्या दिवसभरातील काँग्रेसची ही तिसरी बैठक आहे. यामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असून विविध मुद्द्यावर रणनीती आखली जात आहे.

काँग्रेसची शुक्रवारी संध्याकाळी आठ वाजता कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत भाजपच्या (Bjp ) पत्रकार परिषदेला प्रतिउत्तर देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर होणार आहे. याबाबात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानी बैठक होणार आहे. त्या बैठकीत काँग्रेसकडून नावांची घोषणा केली जाणार आहे. (Congress News)

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भाजप खडबडून जागी झाली आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने आतापासूनच भाजपने आक्रमक रणनीती आखली असून येत्या काळात विरोधकांना सुट्टी न देता प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर दिले जाणार आहे. विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या प्रचाराला त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले जाणार आहे.

त्यासाठी भाजपकडून विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी दहा जणांची फायरबँड टीम मैदानात उतरवली आहे. यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसह 10 जणांची टीम रोज सकाळ-संध्याकाळ विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देणार आहे. त्यामुळे यांच्याकडुन करण्यात येणाऱ्या टीकेला उत्तर देण्यासाठी आता काँग्रेसनेही (Congress) लगेचच पाऊल उचलले आहे.

भाजपची यादी जाहीर होताच अवघ्या दोन तासातच भाजपकडून केल्या जात असलेल्या आरोपांना खोडून काढण्यासाठी व प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसची टीम सज्ज असणार आहे. येत्या काळात भाजपच्या पत्रकार परिषदेला जशास तसे प्रतिउत्तर देण्यासाठी नवीन प्रवक्त्यांची टीम मैदानात उतरवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

काँग्रेसच्या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole), बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, यशोमती ठाकूर आणि इतर प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. शुक्रवारी दिवसभरात काँग्रेसच्या विविध विषयावर दोन बैठका झाल्या आहेत. त्यामुळे दिवसभरातील ही तिसरी बैठक असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT