Bjp News : भाजपचं ठरलं, आता विरोधकांना सुट्टी नाही...!; मुंडे, दानवेंसह 10 जणांची 'फायर ब्रँड' टीम तैनात...

Political News : विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने आतापासूनच भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. येत्या काळात विरोधकांना सुट्टी न देता प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर दिले जाणार आहे.
Chandrshekhar Bawnkule, Raosaheb Danve, Devendra Fadanvis, Pankja Munde
Chandrshekhar Bawnkule, Raosaheb Danve, Devendra Fadanvis, Pankja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसल्याने आता भाजपकडून ताकही फुंकून पिले जात आहे. आगामी काळात होता असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप खडबडून जागी झाली आहे. विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार असल्याने आतापासूनच भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे. येत्या काळात विरोधकांना सुट्टी न देता प्रत्येक आरोपाला प्रत्युत्तर दिले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या प्रचाराचा भाजपला (BJP) फटका बसला. त्यामुळे येत्या काळात विरोधकांकडून करण्यात येत असलेल्या प्रचाराला त्यांच्याच पद्धतीने उत्तर दिले जाणार आहे. त्यासाठी आता भाजपकडून विरोधकांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी दहा जणांची फायरबँड टीम मैदानात उतरवली आहे. (Bjp News)

यामध्ये माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankja Munde), माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंसह 10 जणांची टीम रोज सकाळ-संध्याकाळ विरोधकांकडून केल्या जात असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज असणार आहे.

भाजपकडून रोज सकाळी 9 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी चार जणांची टीम तैनात असणार आहे. त्यामध्ये नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा समावेश असल्याची घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

Chandrshekhar Bawnkule, Raosaheb Danve, Devendra Fadanvis, Pankja Munde
MVA News : धाराशिवमधील तीन जागांवर 'मविआ'च्या घटक पक्षांची दावेदारी; हायकमांड करणार एक घाव दोन तुकडे ?

त्यानंतर संध्याकाळी 4 वाजता प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपकडून 6 जणांची टीम असणार आहे. त्यामध्ये राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, माधव भंडारी, चव्हाण, अतुल भातखळकर आणि राम कदम हे सहा नेते भाजपवर करण्यात आलेल्या टीकेला उत्तर देणार आहेत.

येत्या काळात विभागवार बोलण्यासाठीही भाजपकडून 20 नेत्यांच्या टीम मैदानात उतरवली आहे. या विभागीय टीममध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, माजी केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्यासह 20 नेत्यांच्या टीमचा समावेश असणार आहे.

विधानसभेसाठी भाजपचा 170 ते 180 जागावर दावा

आगामी काळात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने 170 ते 180 जागा लढाव्यात असा आग्रह पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी धरल्याची माहिती आहे. महाराष्ट्र प्रभारी, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री आश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईत झाली. यावेळी भाजपने 170 ते 180 जागा लढाव्यात असा आग्रह धरण्यात आला आहे.

Chandrshekhar Bawnkule, Raosaheb Danve, Devendra Fadanvis, Pankja Munde
Eknath Shinde News : शिवसेना शिंदे गटाचा प्लॅन ठरला; 100 मतदारसंघात प्रभारी, निरीक्षक नेमणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com