Nana Patole Vijay Wadettiwar sarkarnama
महाराष्ट्र

Video Mahavikas Aghadi Meeting : महाविकास आघाडीत काँग्रेस नाराज! बैठकीला नाना पटोले जाणार नाहीत, विजय वडेट्टीवारांनाही निमंत्रण नाही

Nana Patole Vijay Wadettiwar Congress : नाना पटोले यांच्याकडून काँग्रेस मोठा भाऊ असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही, याची चर्चा सुरू होती.

Roshan More

Mahavikas Aghadi Meeting : लोकसभा निवडणुकीतील बंपर यशानंतर महाविकास आघाडीची पहिलीच संयुक्त पत्रकार परिषद आज (शनिवारी) दुपारी होणार आहे. मात्र, या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित राहणार नाहीत. तर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आपल्याला हा पत्रकार परिषदेचे निमंत्रण नसल्याचे सांगितले.

नाना पटोले यांनी आपण दौऱ्यावर असून उपस्थित राहणार नाही. मात्र, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात या पत्रकार परिषदेला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले आहे.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे, शरद पवार यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेतली होती. त्यात नाना पटोले यांच्याकडून काँग्रेस Congress मोठा भाऊ असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे विधानसभेत महाविकास आघाडी एकत्र लढणार की नाही, याची चर्चा सुरू होती.

महाविकास आघाडीला मिळालेले यश हे उद्धव ठाकरेंमुळे मिळाल्याचे संजय राऊत यांनी सांगितले होते. त्यामुळे महाविकास आघाडीत श्रेयवादावरून वाद असल्याची चर्चा होती. मात्र, महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते आम्ही एकत्र असल्याचे सांगत होते.

नाना पटोल Nana Patole हे आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती होती. मात्र, आज ते उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील बैठकीला अजेंडा काय आहे हे आपल्याला माहित नाही. आपल्याला निमंत्रण नसल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT