BJP Political News : लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला आहे.महाराष्ट्रात भाजपला अवघ्या 9 जागा मिळल्याने केंद्रीय नेतृत्व देखील नाराज आहे. अजित पवार गटाचा फायदा झाला नसल्याचे भाजप नेते सांगत आहेत. शिवाय अजित पवारांना महायुतीत घेतल्याने भाजपचा कोअर मतदार नाराज आहे. त्यामुळे भाजप विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा विचार करत असून त्यासाठी सर्वे देखील करत असल्याच्या चर्चा आहेत.
या चर्चांना भाजपकडून अधिकृतपणे कोणीही दुजोरा दिलेला नाही. मात्र, अजित पवार यांच्यामुळे फटका बसला असून शिंदे गटाला जी मदत केली त्याचा पूर्ण लाभ त्यांना घेता आला नसल्याची भावना भाजपमध्ये आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार Ajit Pawar, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मराठा मतदार महायुतीच्या मागे उभे राहतील, अशी भाजपची अपेक्षा होती. मात्र, मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा फटका महायुतीला बसला. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेली युती कायम ठेवावी मात्र अजित पवारांच्या सोबतच्या युतीचा फेरविचार करावा, अशी अपेक्षा भाजपचे पाठीराखे करत आहेत.
अजितदादांमुळे भाजपला BJP फटका बसला नसल्याचे छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. महायुतीला विदर्भात 10 पैकी तीन जागा मिळाल्या. भाजपचे आमदार असलेल्या ठिकाणी देखील भाजपच्या उमेदवार पिछाडीवर आहे, असे छगन भुजबळ म्हणाले.
'ईसकाळ'ने दिलेल्या वृत्तानुसार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी युती करून भाजपची कामगिरी कशी असेल, राष्ट्रवादीसोबतची आघाडी कायम राहायची की नाही असे प्रश्न सर्वेक्षणात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, भाजपचे प्रदेश सह मुख्य प्रवक्ते अजित चव्हाण यांनी ही चर्चा फेटाळली आहे. विरोधकांनी या बातम्या पेरलेल्या असल्याचे अजित चव्हाण म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.