Uddhav Thackeray
Uddhav Thackeray 

Sarkarnama

महाराष्ट्र

जो न्याय मुंबईला, तोच नागपुरला का नाही? काँग्रेस नेत्याच्या पत्राने 'मविआ'त खळबळ

सरकारनामा ब्युरो

नागपूर : काल नवीन वर्षाच्या मुहूर्तावर राज्य सरकारकडून मुंबईकरांना मोठी भेट मिळाली आहे. मुंबईतील ५०० स्केवर फूटांवरील घरांना करमाफी देण्यात आली आहे. नगरविकास खात्याच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली. यानंतर उद्धव ठाकरे यांनीही याबाबत मुंबईकरांशी संवाद साधला. आम्ही दिलेले वचन पुर्ण केले असेही ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान याच निर्णयावरुन सध्या राजकारण रंगल्याच पाहायला मिळत आहे. भाजपने हा निर्णय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असतानाच्या काळातच घेतला असल्याचा दावा केला आहे. तर आता काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने याच निर्णयावरुन मुख्यमंत्री उद्धव (Uddhav Thackeray) ठाकरे यांना घरचा आहेर दिला आहे. जो न्याय मुंबईला, तोच नागपुरला का नाही? असा सवाल करत काँग्रेसचे दिग्गज नेते आशिष देशमुख (Aashish Deshmukh) महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगर पालिका हद्दीतील ५०० वर्ग फुटापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घरांसाठी मालमत्ता कर माफ केला आहे. मुंबईमधील अल्प मध्यम वर्गीय व मध्यमवर्गीय कुटुंबीयांना हा दिलासा देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र मुख्यमंत्र्यांनी राजधानी दिलेला न्याय ते राज्याच्या उपराजधानी नागपूरला का लागू करत नाही? असा सवालाही त्यांनी विचारला आहे.

मागच्या काही वर्षात नागपूर शहरात आजूबाजूच्या ग्रामीण भागातून हजारो कुटुंब नागपुमध्ये स्थायिक झाले आहेत, त्या सर्वांचे घर ५०० वर्ग फूट पेक्षा कमी आकाराचे असून त्यांना मुख्यमंत्र्यांनी न्याय द्यावा, हा दिलासा द्यावा. नागपुरातही असे हजारो कुटुंब आहे ज्यांना अशाच निर्णयाची अपेक्षा आहे. असे आशिष देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT