Congress  Sarkarnama
महाराष्ट्र

Congress First List : ...अखेर काँग्रेसची 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर! 'या' दिग्गज नेत्यांना तिकीट

Congress First Candidate List 2024 : महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या यादीही जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वांचेच लक्ष काँग्रेसकडे लागलेले होते.आता काँग्रेसचीही 48 उमेदवारांची जाहीर करण्यात आली आहे.

Deepak Kulkarni

Congress Candidate List Maharashtra 2024: एकीकडे महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यातच आता महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही आपापल्या याद्या जाहीर करत उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर सर्वांचेच लक्ष काँग्रेसकडे लागलेले होते.आता काँग्रेसचीही 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या पहिल्या यादीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, यशोमती ठाकूर यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. तसेच लातूर शहरमधून अमित देशमुख, लातूर ग्रामीणमधून धिरज देशमुख, नायगाव मतदारसंघातून मीनल पाटील खतगावकर यांना संधी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीमधील तिन्ही प्रमुख घटक पक्षासाठी पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 85-85-85 जागांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 65 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.

त्यात गुरुवारी (ता.24) 45 उमेदवारांची यादी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून जाहीर करण्यात आली. त्यानंतर काहीच वेळात आता काँग्रेसकडूनही 48 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या (Congress) पहिल्या यादीत विद्यमान आमदारांसह नवीन चेहऱ्यांनाही संधी दिली आहे. अक्कलकुवातून के. सी. पाडवी, शहादा येथून राजेंद्र गावित, धुळे ग्रामीणमधून कुणाल पाटील, नंदुरबारमधून किरण तडवी, रावेरमधून धनंजय चौधरी, मलकापूरमधून राजेश एकडे, नवापूर येथून शिरीशकुमार नाईक, चिखलीतून राहुल बोंद्रे यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच कसब्यातून रविंद्र धंगेकर यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aaghadi) काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घमासान सुरू आहे. विदर्भातील काही जागांसाठी हा खेळ सुरू होता तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष देखील भूमिकेवर ठाम होता. पण शरद पवार यांच्या हस्तक्षेपानंतर काँग्रेसकडून पुढाकार घेत ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना 'मातोश्री'वर चर्चेला पाठवण्यात आलं होतं.

आता त्यानंतर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी 22 ऑक्टोबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT