Mumbai : काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसमधील आणखी पाच ते सहा आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. भाजपमध्ये प्रवेश न करता काही जण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Maharashtra Politics )
विश्वजित कदम, अमर राजूरकर, जितेश अंतापूरकर, माधव जवळकर, अमित झनक, अस्लम शेख यांच्यासह आणखी काही आमदार राजीनामा देणार असल्याची चर्चा होत आहे. भाजपमध्ये प्रवेश न करता काही जण अजित पवार यांच्यासोबत जातील, असेही म्हटले जात आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात काँग्रेसचे सहा आमदार असल्याचे सांगण्यात येते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी सदस्यत्वाचा राजीनाम्यावर काँग्रेसचे अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत. आगे आगे देखो होता है क्या, असे सूचक वक्तव्य केले होते. अशोक चव्हाण यांच्या भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबत मात्र आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीदेखील अशोक चव्हाण आपल्या संपर्कात नाहीत, असे म्हटले आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून सहा जागा आहेत. भाजप स्वबळावर तीन जागांवर विजयी होऊ शकतो. मात्र, आता काँग्रेसमधून आमदार राजीनामा देणार असल्याची चर्चा होत असल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. इतर राज्यातील राज्यसभा उमेदवार भाजपने घोषित केले आहेत. मात्र, महाराष्ट्रातील उमेदवार अजून घोषित करण्यात आले नाहीत. त्यामुळे काँग्रेसमधून राजीनामा दिलेल्यांना राज्यसभेवर संधी मिळणार का? याचीदेखील चर्चा आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.