Ashok Chavan Resign Congress : विश्वासदर्शक ठरावाला उशीर ते भाजप पदाधिकाऱ्याच्या घरची चव्हाणांची ‘ती’ भेट ठरली महत्त्वपूर्ण...

Maharashtra Politics : युती सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह तब्बल १० आमदार उशिराने पोचले होते.
Ashok Chavan
Ashok Chavan Sarkarnama

Mumbai News : काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडल्यापासूनच चव्हाण हे भाजपच्या जवळ गेल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. मात्र, चव्हाण ते नाकारत होते. युती सरकारच्या विश्वासदर्शक ठरावापासून सुरू झालेला हा सिलसिला आज पूर्णत्वास आल्याचे दिसते. सप्टेंबर-२०२२ मधील गणेशोत्सवाच्या काळात भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरी झालेली ‘ती’ भेट महत्त्वपूर्ण ठरली, हे आजच्या चव्हाण यांच्या निर्णयातून स्पष्ट झाले. (Ashok Chavan's visit to BJP office bearer's house was important)

आमदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पत्र पाठवून पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे. चव्हाण हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे. भाजपकडून चव्हाण यांना राज्यसभेवर पाठविण्यात येणार असल्याचीही चर्चा आहे. मात्र, त्यासंदर्भातील कोणतेही विधान चव्हाण अथवा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात आलेले नाही. (Ashok Chavan Resign Congress)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ashok Chavan
Ashok Chavan Resigned From Congress : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर फडणवीस म्हणाले, आगे आगे देखो होता है क्या!

दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आले. त्या सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावेळी खुद्द माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह तब्बल १० आमदार उशिराने पोचले होते. उशिरा पोचल्यामुळे या दहा आमदारांना मतदान करता आले नव्हते. या दहा आमदारांमध्ये बहुतांश आमदार हे चव्हाण यांचे समर्थक होते.

विश्वासदर्शक ठरावापासूनच अशोक चव्हाण यांच्या भूमिकेबाबत चर्चा होत होती. माजी मुख्यमंत्र्यांना विश्वासदर्शक ठरावासाठी वेळेच्या अगोदर पोचणे आवश्यक असते, हे माहिती नव्हते का, असा सवाल त्यावेळी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर काही दिवसांनी आणखी एक घटना घडली, ती चव्हाण हे भाजपच्या जवळ गेल्याचे दर्शविणारी होती.

Ashok Chavan
Kolhapur Loksabha : कोल्हापुरात महायुती मास्टरस्ट्रोकच्या तयारीत; महाविकास आघाडीचे गणित बिघडवणार

राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील समन्वयासाठी भाजपचे पदाधिकारी आशिष कुलकर्णी यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी कुलकर्णी यांचे घर हे महत्त्वाच्या राजकीय घडामोडीचे केंद्र बनले होते. सप्टेंबर-२०२२ मधील गणेशोत्सवाच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुलकर्णी यांच्या घरी गणेशाच्या दर्शनासाठी गेले होते. त्याच ठिकाणी अशोक चव्हाण गेले होते. त्यावेळी चव्हाण आणि फडणवीस या दोघांमध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाली होती. कुलकर्णी यांच्या घरातील ती भेट राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरली होती.

R

Ashok Chavan
Rajya Sabha Election 2024 : पंकजा मुंडेंनी दुःख बोलून दाखवले; राज्यसभेसाठी नाव चर्चेला येण्याचे कारणही सांगितले...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com