Eknath Shinde Government Labor Kit scheme sarkarnama
महाराष्ट्र

Mahayuti Scam : धक्कादायक! बांधकाम कामगारांच्या किटवर श्रीमंतांचा डल्ला? शिंदे सरकारचा घोटाळा येणार बाहेर

Congress MLA Vikas Thakre On Labor Kit Distribution Scam : विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्यावतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे किट वाटप करण्यात आले होते.

Rajesh Charpe

Nagpur News : विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी महायुतीच्यावतीने असंघटित क्षेत्रातील बांधकाम कामगारांना मोठ्या प्रमाणात साहित्याचे वाटप झाले होते. याकरिता मोठमोठे कार्यक्रम करण्यात आले होते. हजारो कामगारांना एकाच दिवशी साहित्याची किट वाटप करण्यात आली होती. यात मोठा घोटाळा झाला असल्याची शंका व्यक्त केली जातेय. नागपूरचे काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विकास ठाकरे यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत लाभार्थ्यांची यादीच मिळवली असून कामगार मंत्र्यांकडे सादर केली आहे. त्यामुळे शिंदे सरकारच्या कार्यकाळातील आणखी एक घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विकास ठाकरे यांनी या घोटाळ्याकडे लक्ष वेधले होते. आपल्याकडे लाभार्थ्यांची यादीत असून यातील काही लाभार्थी हे कामगार नाहीत, अशांना किट वाटप करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर कामगार मंत्री कारवाई करणार की नाही अशी विचारणा त्यांनी केली होती.

विकास ठाकरे यांनी विचारलेल्या या प्रश्नावर कामगार मंत्र्यांनी तपासून कारवाई करू, असे आश्वासन दिले आहे. मात्र विकास ठाकरे यांच्याकडे असलेल्या कामगारांच्या यादीत कोणाकोणाची नावे आहेत याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. नागपूरमध्ये झालेल्या साहित्य वाटपच्या कार्यक्रमानंतर किट अनेक प्रतिष्ठित तसेच श्रीमंतांकडे घरपोच पोहचवून दिल्याची चर्चा रंगली होती. ठाकरे यांच्या दाव्यानंतर यात तथ्य असल्याचे दिसून येते असून आता किट घेणाऱ्या बोगस कामगारांची यादी यादी सर्वाजनिक केल्यास अनेकांचे बिंग फुटू शकते.

कामगारांना किट वाटप करण्याचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर धडाधड अर्ज भरून घेण्यात आले होते. अर्ज भरणारा कामगार आहे की नाही याची कुठलीही खातरजमा करण्यात आली नव्हती. ज्याने अर्ज भरले त्याला कीट वाटप करण्यात आली. कीट घेण्यासाठी अक्षरशः नागपूरमध्ये रांगा लागल्या होत्या.

विधानसभा मतदारसंघनिहाय नागपूर शहरात किट वाटपचे सहा कार्यक्रम घेण्यात आले होते. एका कार्यक्रमात चेंगराचेंगरी झाली होती. पोलिसांना लाठीमार करून त्यांना पांगवावे लागले होते. रेशीमबाग येथील सुरेश भट सभागृहात झालेल्या कार्यक्रमात किट घेण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली होती. सभागृहात पाय ठेवायला जागा नसल्याने प्रवेशदार बंद करण्यात आले होते. त्यानंतरही अनेकजण प्रवेशदारावरून उड्या मारून आत जात असल्याने पोलिसांनी लाठीमार केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT