Vikas Thakre : नाना पटोलेंना मुख्यमंत्री करा; ठाकरे आणि लोंढेंची, पद हिसकावण्याची अन् स्वस्थ न बसण्याची भाषा

Congress MLA Vikas Thakre statement to make Nana Patole the Chief Minister is in discussion : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री करण्यासाठी नागपूरच्या काँग्रेसच्या आढावा बैठकीतील विधानांमध्ये 'मविआ'त अस्वस्थता पसरली आहे.
Vikas Thakre
Vikas ThakreSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नागपूर इथल्या काँग्रेस आढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा, अशी कार्यकर्त्यांनी मागणी लावून धरली आहे.

आमदार विकास ठाकरे आणि प्रवक्ता अतुल लोंढे यांनी नाना पटोले यांना मुख्यमंत्रीपदासाठी योग्य असल्याचं सांगताच, बैठकीत कार्यकर्त्यांनी समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

नागपूर इथं काँग्रेसची (Congress) आढावा बैठक झाली आहे. या बैठकीत नाना पटोले यांना मुख्यमंत्री करा, अशी कार्यकर्त्यांनी बाजू लागून धरली. आमदार विकास ठाकरे यांनी, नाना पटोलेंना काँग्रेसच्या पडत्या काळात काँग्रेसला अच्छे दिन आणून दिले आहे. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ते पद हिसकावून घेऊ, असं म्हणत खळबळ उडवून दिली. प्रवक्ता अतुल लोंढे यांनी नाना पटोले मुख्यमंत्री होईपर्यंत स्वस्थ्य बसणार नाही, असं म्हटलं आहे.

Vikas Thakre
Dhangar Reservation :'...तर सरकारच्या तोंडावर राजीनामा फेकू', धनगर आरक्षणावर आमदार भडकला

उत्साही कार्यकर्त्यांच्या या प्रकारावर नाना पटोले यांनी सावध प्रतिक्रिया घेतली. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले, "पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटत असते की, त्यांचा नेता मुख्यमंत्री व्हावं म्हणून. 'मविआ'मध्ये एक विचारानं आणि काँग्रेस हायकमांड यावर निर्णय होईल. पण आमच्यासमोर महाराष्ट्र गुजरातधार्णिज्य करणाऱ्यांना रोखण्याचं महत्त्वाचं काम आमच्यासमोर आहे. कार्यकर्त्यांमध्ये काय चर्चा होते, तो विषय आमच्यासाठी महत्त्वाचा नाही".

Vikas Thakre
Political News : राज्यात नव्या राजकीय समीकरणाची जुळवाजुळवा; 'हे' दोन पक्ष एकत्र येण्याची शक्यता?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी हा महाविकास आघाडी म्हणून मुख्यमंत्रीपदावर निर्णय घेऊ, असे म्हटलं. "काही उत्साही कार्यकर्ते असतात, ते निरनिराळी नावं घेत असतात, ती मान्य करण्याचं काही कारण नाही. हिसकावून घेण्याची आणि स्वस्थ न बसण्याची भाषा म्हणजे, ते उत्साही कार्यकर्ते आहेत. ते सर्वच पक्षात असतात, आणि ते असायला देखील हवेत", असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

आमदार विकास ठाकरे काय म्हणाले

प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की, त्याच्या जिल्ह्यातील किंवा भागातील माणूस मुख्यमंत्री व्हावा, नाना पटोले विदर्भाचे नेते आहेत. त्यांची मेहनत आहे. विदर्भातून काँग्रेसला भरभरून जागा मिळाल्या, तर नैसर्गिक क्लेम त्यांचाच असेल. यासाठी राहुल गांधी यांना आम्ही सगळे विदर्भातील कार्यकर्ते साकडे घालू. नानाभाऊसाठी मुख्यमंत्री खेचून आणू. काँग्रेसमध्ये सर्वच सक्षम नेते आहेत.

या स्पर्धेत विदर्भातील जनतेने जास्त जागा दिल्या, तर विदर्भातील जनतेचा हक्क आहे. विदर्भ नंबर वन असला, तर यावर हायकमांड सुद्धा न्याय करेल. महाविकास आघाडी म्हणून नाही, तर काँग्रेसकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा द्यायचा असेल, तर नैसर्गिक रित्या नाना पटोले यांचा नाव असेल. विदर्भातून जास्त जागा आल्,या तर आम्ही साकड घालू आणि म्हणू की विदर्भातील नेतृत्वाला संधी द्या. यात काय गुन्हा आहे? त्यामुळे विदर्भातील लोक जोमाने आमदार निवडून आणण्यासाठी काम करतील, असे विकास ठाकरे यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com