Nana Patole sarkarnama
महाराष्ट्र

Nana Patole: धनंजय मुंडे एकटे नाहीत, ६५ टक्के मंत्री गुन्हेगार, त्यांचे राजीनामे भाजप घेणार का?

Nana Patole Attacks on Dhananjay Munde: गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या निकषावर ६५ टक्के मंत्र्यांना राजीनामा द्यावे लागेल. भाजपने हिंमत दाखवून अशा सर्व मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

Rajesh Charpe

Nagpur, 31 Jan 2025: बीड आणि परभणी प्रकरणातील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी ,या मताचे आम्ही आहोत.महायुतीमधील ६५ टक्के मंत्री गुन्हेगार आहेत. धनंजय मुंडे एकटे नाहीत. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या निकषावर ६५ टक्के मंत्र्यांना राजीनामा द्यावे लागेल. भाजपने हिंमत दाखवून अशा सर्व मंत्र्यांचे राजीनामे घ्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचा निकलावरुन महायुतीच्या विरोधात सडेतोड मत व्यक्त केले. बाळासाहेब थोरात कसे पराभूत झाले, राजू पाटलांना त्यांचा गावातून एकही मत मिळाले याबाबत आश्चर्य व्यक्त करून त्यांनी निवडणूक आयोगाचा कारभारावर शंका व्यक्त केली. महायुतीला टोलेही हाणले.

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान राज ठाकरे हे भाजपच्या बाजूने होते. असे असताना त्यांनी थेट टीका केल्याने ते आता महाविकास आघाडीत सहभागी होणार असल्याचे तर्क-वितर्क लावले जात आहे. याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना याबाबत विचारणा केली असता त्यांची आणि काँग्रेसची भूमिका एकच असल्याचे सांगितले.

काँग्रेसने निवडणूक आयोगाचा प्रणालीवर भूमिका मांडली आहे. तीच भूमिका राज ठाकरे यांनी व्यक्त केली. ७६ लाख वाढीव मते आली कडून याची माहिती अद्याप निवडणूक आयोगाने आम्हाला दिली नाही. दिवसा ढवळ्या भाजपने लोकशाहीचा गळा चिरला आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.

ऑपरेशन टायगरबाबत मत व्यक्त करताना पटोले म्हणाले, कोणाला कुठे जायचे हा त्यांचा निर्णय आहे. मला याबाबत ठावूक नाही. मात्र काही राजकारणी व्यावसायिक असतात. ते सत्तेसोबत वाहत जातात. भाजपने कितीही तोडफोड केली तरी काँग्रेसचा विचार कोणी मारू शकत नाही. हे सरकार धोक्याने आले आहे. मात्र ही धोकाधडी प्रत्येक वेळी चालत नसते. पुढच्या काळात काँग्रेसचे सरकार बहुमताचे राहील, असाही दावा त्यांनी यावेळी केला.

संघाने भाजपला जाब का विचारला नाही

राहूल गांधी काय म्हणाले, कुठल्या उद्देशाने बोलले ते मला माहीत नाही. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही धार्मिक संस्था आहे. आमचा राजकारणाशी संबंध नाही असे ते दावे करतात. मात्र भाजपला नेहमीच मदत करतात. भाजपने महाकुंभ मेळ्याचा इव्हेंट उभा केला. त्यामुळे भाविकांचा मृत्यू झाला. या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने वक्तव्य केलेले नाही. हिंदू रक्षक संघाने यावर भाजपला जाब विचारला नाही, असेही नाना पटोले म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT