Maharashtra Politics: कोल्हापूर हद्दवाढीचा चेंडू सतेज पाटलांनी महायुतीकडे ढकलला; म्हणाले, "सत्ता त्यांची निर्णय त्यांनी घ्यावा..."

Kolhapur Infrastructure Growth MLA Satej Patil: . देशातील अनेक पक्ष जर ईव्हीएम बाबत ही भूमिका मांडत असतील तर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.
Satej Patil
Satej Patil Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्याने महायुतीला भरभरून यश दिले आहे. आता महायुतीच्या लोकप्रतिनिधींनी याबाबतचा निर्णय घ्यावा. या पुढे विकासाचे मॉडेल निर्माण करणे आता हे महायुतीच्याच आमदारांची जबाबदारी आहे. पूर्ण बहुमत असलेलं महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे आता कोल्हापूरची काय प्रगती होणार याची वाट कोल्हापूरकर पाहत आहेत.

हद्दवाढीचा निर्णय आता सत्तेत असलेल्या मंडळींनीच घ्यायचा आहे, आमच्या हातात काहीही नाही, अशी प्रतिक्रिया हद्दवाढी बाबत काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी देत महायुतीच्या नेत्यांवर जबाबदारी सोपवून टाकली आहे. मात्र हद्दवाढी बाबत स्वतःची स्पष्ट भूमिका नेमकी काय हे स्पष्ट केलेले नाही. कोल्हापुरातील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

प्रयागराजमध्ये घडणाऱ्या वारंवार घटनेबाबत बोलताना, महाकुंभला आध्यात्मिक पाठबळ आहे. हा इव्हेंट जागतिक पातळीवर घेऊन जाण्याच्या नादात सामान्य नागरिकांकडे दुर्लक्ष होते. महाकुंभमध्ये व्हीआयपीसाठी विशेष नियोजन केल्याचं आम्ही आज पाहिलं असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला. असेच नियोजन सामान्य नागरिकांसाठी होणं गरजेचं आहे. कारण हा देश सामान्य नागरिकांचा असल्याचे स्पष्ट केले.

Satej Patil
Dhananjay Munde: धनंजय हा गुन्हेगार नाही; नामदेव शास्त्री यांच्याकडून मुंडेंची पाठराखण

पालकमंत्री? सहपालकमंत्री नंतर आता सहचा सहपालकमंत्री ही नेमला जाऊ नये, एवढीच अपेक्षा आहे. सरकारमध्ये बेबनाव आहे हे यावरून दिसते. मंत्रालयातील कामकाज सध्या पूर्णपणे ठप्प आहे. कोणत्याही मंत्र्याच्या ऑफिसचा सेटअप पूर्ण झालेला नाही. कारण मुख्यमंत्रीच सगळ्यांवर निर्णय घेणार आहेत. सरकार सध्या बंद असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली. भाजपचे पालकमंत्री जिथे आहेत तिथे सह पालकमंत्री दिसत नाहीत हा योगायोग नाही तर हा भाजप न केलेला सिस्टिमॅटिक कार्यक्रम आहे.

सातत्याने विरोधकांकडून होणाऱ्या ईव्हीएम आरोपावरून बोलताना लोकांनी केलेलं मतदान नेमकं कोणाला जाते.याबाबत विश्वास निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाच आहे. प्रमुख राजकीय पक्षांसह नागरिकांनी देखील याबाबत विस्तृत खुलासा करण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.

Satej Patil
Suresh Dhas: सुरेश धसांनी अजितदादांना दिलेल्या पेन ड्राईव्ह मध्ये दडलंय काय? 500 जण कोमात...

याचाच भाग म्हणून राज ठाकरे यांनी हे वक्तव्य केले आहे. आपण टाकलेलं मत कुठे जातंय? अशी भावना जर लोकांच्या मनात येत असेल तर निवडणुकांवरील विश्वास उडेल.

निवडणूक आयोगानं किमान आता तरी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट हे सर्व पक्षांना एक एक देऊन टाकावे. त्या त्या पक्षांना पडताळणी करू द्या. देशातील सर्व पक्षांचा विश्वास बसेल अशी एखादी प्रक्रिया निवडणूक आयोगाने करावी. आज अनेक गावातील लोक मतपत्रिकेद्वारे आमचं मतदान घ्या, अशी मागणी करीत आहेत.

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे विश्वासार्हता वाढवायचे असेल तर निवडणूक आयोगाने मतपत्रिकेवर मतदान घ्यायला हरकत नाही. ईव्हीएम विरोधातील भूमिकेवर राज ठाकरे यांना सोबत घेण्याबाबत अजून तरी वरिष्ठ स्तरावर चर्चा झालेली नाही. देशातील अनेक पक्ष जर ईव्हीएम बाबत ही भूमिका मांडत असतील तर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली पाहिजे, अशी मागणी सतेज पाटील यांनी केली.

केंद्रीय अर्थसंकल्पवरून बोलताना, शेतीमालावरील जीएसटी कमी व्हावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. मध्यमवर्गीयांना कराच्या सवलती मिळाल्या पाहिजेत. डॉलरची वाढती किंमत पाहता देशाचा अर्थकारण पूर्णपणे बिघडला असल्याचा आरोप पाटील यांनी केला. अध्यक्षपदाबाबत काय चर्चा सुरू आहे? हे जाहीर बोलणं संयुक्तिक नाही. श्रेष्ठी जो निर्णय देतील तो सर्वांना मान्य असेल. सगळे दिल्ली विधानसभा निवडणुकीत व्यस्त आहेत. शिवाय संसदेचा अर्थसंकल्पीय अधिवेशन देखील आहे. सगळ्या घडामोडीनंतर राज्यातले सगळे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com