Congress News Sarkarnama
महाराष्ट्र

Congress News : काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, उद्यापासून सलग दहा दिवस मॅरेथॉन बैठका; इच्छुकांची धाकधूक वाढली

Political News : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून आतापासूनच विविध मतदारसंघाची चाचपणी करून आढावा घेतला जात आहे, तर काही जणांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : तोंडावर आलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांमध्ये लगीनघाई सुरु आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून आतापासूनच विविध मतदारसंघाची चाचपणी करून आढावा घेतला जात आहे, तर काही जणांनी मतदारसंघात मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे.

महाविकास आघाडीचे (MVA) जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे लवकरच जागावाटपाची घोषणा करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता काँग्रेस (Congress) अ‍ॅक्शन मोडवर आली आहे. उद्यापासून राज्यातील सलग दहा दिवस इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. त्यासाठी दिग्ग्ज नेत्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीची घोषणा पुढच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे दिवाळीनंतर निवडणूक होण्याची शक्यता आहे. या सर्व राजकीय पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी मोठी तयारी केल्याचे दिसत आहे. काँग्रेसने 1ऑक्टोबरपासून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात करणार आहे.

विधानसभेसाठी काँग्रेस पक्षाकडे आतापर्यंत एकूण 1 हजार 688 इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी काँग्रेसने नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत नेते जिल्ह्यात जाऊन मुलाखती घेण्यात येणार आहे. तर काँग्रेसचे बडे नेते त्यांचा अहवाल हा प्रदेश काँग्रेसला देणार आहेत. त्यांनतर उमेदवारांची घोषणा केली जाणार आहे.

आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान, खासदार चंद्राकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, माजी मंत्री सतेज पाटील, अमित देशमुख, नितीन राऊत, यशोमती ठाकूर, विश्वजीत कदम, वसंत पुरके, नाना गावंडे या नेत्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.

काँग्रेसचे दिग्ग्ज नेते प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यानंतर त्या मुलाखतीचा अहवाल हा प्रदेश काँग्रेसला देण्यात येणार आहे. त्यांनतर उमेदवारांची यादी ठरणार असल्याचे समजते. त्यामुळे सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT