Eknath Shinde News : लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपये तुमच्या डोळ्याला टोचतात; ठाकरेंवर मुख्यमंत्री शिंदेंचा घणाघात

Political News : राज्यातील हे सरकार कोणत्याही परिस्थितीत उलथून टाकायचंच...संघाने पोसलेल्या रोपट्याला दाढीवाला डिंक्या आणि गुलाबी अळी लागलीय, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Eknath Shinde and Uddhav Thackeray
Eknath Shinde and Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : नागपूर येथे रविवारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली होती. राज्यातील हे सरकार कोणत्याही परिस्थितीत उलथून टाकायचंच...संघाने पोसलेल्या रोपट्याला दाढीवाला डिंक्या आणि गुलाबी अळी लागलीय, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यांच्यावर केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपये तुमच्या डोळ्याला टोचतात, असे म्हणत त्यांनी ठाकरेंसह विरोधकांवर निशाणा साधला आहे.

दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली. त्यावेळेस पासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. प्रत्येक कार्यक्रमातून एकमेकांवर निशाणा साधत असतात. नागपूर दौऱ्यावर असताना एका कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरेंनी केलेली टीका मुख्यमंत्री शिंदेच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. (Eknath Shinde News)

त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हणाले की, 'लोकांना काहीच देऊ शकणार नाहीत, असे त्यांनी स्वत: कबूल करून टाकले ते बरे केले. कुणालाच काही देण्याचे यांना माहीतच नाही. यांना फक्त घेणे माहीत आहे. यांच्याकडे दानत नाहीच. आमच्या लाडक्या बहिणींना दिलेले पंधराशे रुपयेही तुमच्या डोळ्याला टोचतात. बहिणीला ओवाळणी देण्याची संस्कृतीही यांना मान्य नाही? त्यामुळेच आता मिळतात अगदी तेवढे पैसेही बहिणींना देणार नाही, असे हे सांगतात. त्यांची महिला वर्गाबद्दलची आस्थाही यांच्या हिंदुत्वासारखीच बेगडी आहे,' अशी टीका शिंदेंनी केली.

'काही नेते हताश आणि हरलेल्या मानसिकतेने संघटना चालवत आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा करा या मागणीसाठी हातात कटोरा घेऊन दिल्लीचे उंबरे झिजवणे, ही भीक असते.' त्यासोबतच वसुली प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या आणि शेतकऱ्यांची बँक गिळली म्हणून न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या लोकांच्या बाजूला बसून भ्रष्टाचाराबद्दल बाता करण्यासारखा कोडगेपणा नाही, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीसाठी 'या' दिवशी होणार मतदान; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज

राज्यातील पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा पाठिंबा आणि सढळ हाताने होणाऱ्या मदतीला भीक म्हणून संबोधत हेटाळणी करणारे, विरोध करणारेच खरे महाराष्ट्रद्वेष्टे आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा तुम्ही केली, पण पैसे आमच्या सरकारने दिले, असे मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केले.

'निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा करू नये'

भाजपचे हिंदुत्व मान्य आहे का, असा प्रश्न नागपूरमध्ये सरसंघचालकांना विचारला गेला. तुम्ही तुमच्या शिवसेनेचेच हिंदुत्व बासनात बांधले... ते आधी लोकांसमोर कबूल करा, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. निवडणुकीला घाबरणाऱ्यांनी डिपॉझिट जप्त करण्याची भाषा तर करूच नये. अन्यथा निवडणुकीच्या रिंगणात उतरावे. महाराष्ट्र हा कणखर, रांगड्या, राकट लोकांचा देश आहे. इथे असे “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली” म्हणून भोकाड पसरणारे नेते लोकांना आवडत नाहीत. या घरबशांना लोक पुन्हा कायमचे घरी बसवल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका एकनाथ शिंदे यांनी पोस्टमधून केली आहे.

Eknath Shinde and Uddhav Thackeray
MVA News : 'मविआ'चे जागावाटप जवळपास फायनल; 22 जागांवरील तिढा कायम असल्याचे ठाकरे गटाच्या नेत्यांने केले स्पष्ट

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com