महाराष्ट्र

Congress On Rane : '...याशिवाय राणे कुटुंबीयांना काही येत नाही' ; काँग्रेसनेही सोडलं टीकास्त्र!

Atul Londhe on Jaideep Apte : '...म्हणून जयदीप आपटे पकडला जात नाहीये का? ' असा सवालही काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपस्थित केला आहे.

Mayur Ratnaparkhe

Congress spokesperson Atul Londhe On Rane Family : 'वा नितेश राणे वा, संपूर्ण राणे कुटुंब आपल्याच सरकारला आपल्याच पोलिसांना शिव्या देत आहे . हे फेल्युअर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आहे. म्हणे मावळ्यांचे पुतळे तोडले तिथे सीसीटीव्ही लावले नाहीत कोणाचा दोष? , सरकार तुमचं, पोलीस तुमचे तुमचे, लाडके गृहमंत्री तुमचे मग दोष कोणाला?' असा सवाल करत काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राणे कुटुंबावर जोरदार टीका केली आहे.

अतुल लोंढे(Atul Londhe) यांनी म्हटले की, 'धर्माच्या नावावर द्वेष पेरायचा आणि आपली राजकीय पोळी भाजायची याशिवाय राणे कुटुंबीयांना काही येत नाही. त्यांचे जुने व्हिडिओ काढले तर आरएसएस आणि भाजपवरचे असेच व्हिडिओ मिळतील.'

याचबरोबर 'दंगली कोणाला घडवायच्या आहेत हे स्पष्ट दिसून येतंय. जी लोक सातत्याने धर्माच्या नावावर विषारी वक्तव्य करत असतात त्यांना दंगली भडकवायच्या असतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुयायी, संविधानाला मानतात ते मोर्चे काढतात ते विषयावर जनजागृती करतात आणि सरकारला कारवाई करायला भाग पाडतात.'

तसेच 'आंदोलनं जनतेचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी आहे आणि सरकारला कारवाईसाठी भाग पाडण्यासाठी आहेत. सरकार किती निर्दयी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा(Chhatrapati Shivaji Maharaj) कसा राजकीय वापर करतय हे सांगण्यासाठी आंदोलन आहे.' असंही लोंढे म्हणाले.

याशिवाय शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणाऱ्या जयदीप आपटेबाबत बोलताना अतुल लोंढे यांनी म्हटले की, 'असं म्हणतात जयदीप आपटे हे श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांचे मित्र आहेत. पण महाराष्ट्राचा अवमान केला त्यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर कसली खूण दाखवली त्यातून काय त्यांना दाखवायचं होतं आणि आता ते भेटत नाही आहेत ते कोणी माल्ल्या किंवा नीरव मोदी आहेत का? त्यांच्या घराखाली संरक्षण लावले आहेत जेणेकरून पत्रकार तिथे जाऊ नये.'

तसेच 'एक असा देखील संशय येतोय की जयदीप आपटे पकडले गेले, तर खरी किंमत किती होती कोट्यावधी होती का काही लाख रुपये होते. परमिशन का घेतल्या नाहीत? घाई का झाली? हे सगळं समोर येईल. तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेशी कसा खेळ केला गेला या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. म्हणून जयदीप आपटे पकडला जात नाहीये का? असा देखील संशय आम्हाला येतोय.' असंही यावेळी काँग्रेस प्रवक्ते लोंढे म्हणाले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT