Atul Londhe News : 'केंद्रात सरकार येणार नसल्याने 'NDA'च्या घटक पक्षात..' ; अतुल लोंढेंचं वक्तव्य!

Congress spokesperson Atul Londhe : 'अजित पवारांनाही पराभवाची चाहूल, सहकारी सोबत राहतील का याची चिंता. ही चिंताच त्यांच्या आजच्या भाषणातून स्पष्ट झाली आहे.' असंही म्हणाले आहेत.
Atul Londhe
Atul LondheSarkarnama

Congress Vs NDA News : लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पार पडले आहे आणि 1 जून रोजी अंतिम टप्प्यातील म्हणजेच सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यानंतर 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तत्पुर्वी राजकीय पक्षांकडून विविध दावे केले जात आहेत. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही या पार्श्वभूमीवरच विधान केलं आहे.

'भारतीय जनता पक्षाचे सरकार 4 जूनला पुन्हा सत्तेत येणार नाही हे स्पष्ट झालेले आहे. 'अबकी बार 400 पार'च्या कितीही गप्पा मारल्या तरी देशात तशी परिस्थिती नाही. लोकसभा निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने भाजपच्या सहकारी पक्षांमध्येही चलबचल वाढू लागली आहे.'

तसेच, '4 जूनला 'एनडीए'चा पराभव होऊन इंडिया आघाडीचेच सरकार येणार असे चित्र असल्याने 'एनडीए'मध्ये चिंतेचे वातावरण आहे.', असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे(Atul Londhe) यांनी म्हटले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Atul Londhe
Rajya sabha Election 2024 : अजितदादा कुणाला पाठवणार राज्यसभेवर? 25 जूनला निवडणूक

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, 'देशाचे मावळते गृहमंत्री देशाच्या मावळत्या पंतप्रधानांच्या बाबतीत असे म्हणत असतील की 4 जूननंतर होणाऱ्या पंतप्रधान पदाच्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित असतील, तर जरा तपासून पाहिले पाहिजे. भंडाऱ्यापासून पंजाबपर्यंत शेतकरी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना गावात प्रवेश करु देत नाहीत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांना पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी घेराव घातला व पळवून लावले तरीही भाजपा नेत्यांचे डोळ्यात धुळ फेकण्याचे काम सुरुच आहे.'

याशिवाय, 'राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व भाजपाबरोबर सत्तेत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) हे तर बारामतीचे मतदान झाल्यानंतर कुठेच दिसले नाहीत. मुंबईच्या प्रचारातही अजित पवार दिसले नाहीत. 4 जूनला वेगळा निकाल लागला तर म्हणजे इंडिया आघाडीचे सरकार आले तर अजित पवार यांना त्यांच्याबरोबरचे सहकारी त्यांच्यासोबतच राहतील का? पक्षाचे अधिवेशन होईल का? असे प्रश्न पडलेले आहेत आणि ही चिंताच त्यांच्या आजच्या भाषणातून स्पष्ट झाली आहे.' असा टोलाही लोंढे यांनी लगवला.

Atul Londhe
Ajit Pawar News : 'कल्याणीनगर' प्रकरणात पोलिसांना फोन केला होता? अजित पवार म्हणाले, 'दोषी असेन तर मलाही...

याशिवाय भाजपाने कितीही 400 पारचा नारा दिला. तरी त्यात त्यांना यश येणार नाही, 4 जून नंतर केंद्रात इंडिया आघाडीचेच सरकार येणार.' असा विश्वास अतुल लोंढे यांनी व्यक्त केला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com