Nana Patole, balasaheb thorat, vijay vaddetivar, ramesh chennithla, Pruthvairaj chavan  Sarkarnama
महाराष्ट्र

Congress News : लोकसभेचा स्ट्राइक रेट कायम ठेवणार; 'हायकमांड'च्या आदेशानंतर काँग्रेस करणार इतक्या जागांवर दावा

Political News : काँग्रेसने नुकताच राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय जागांचा आढावा घेतला आहे. त्यासोबतच राज्यात करण्यात आलेल्या सर्व्हेच्या आधारे काँग्रेसने कोणत्या जागावर दावा करता येतो याची चाचपणी पूर्ण केली आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे मरगळ आलेल्या काँग्रेसला बूस्टर डोस मिळाला आहे. त्यामुळे आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसची बार्गेनिग पॉवर ही चांगलीच वाढली आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसने 115 जागा लढवाव्यात असा स्पष्ट आदेश दिल्लीहून देण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या प्रभारीसह काँग्रेसचे दिग्गज आता कामाला लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. काँग्रेसने (Congress) नुकताच राज्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय जागांचा आढावा घेतला आहे. त्यासोबतच राज्यात करण्यात आलेल्या सर्व्हेच्या आधारे काँग्रेसने कोणत्या जागावर दावा करता येतो याची चाचपणी पूर्ण केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीत काँग्रेसच मोठा भाऊ असून त्यामुळे येत्या काळात काँग्रेसने 115 जागेवर दावा करणार आहे. या त्यांच्या दाव्याला दिल्लीतील हायकमांडने हिरवा कंदील दर्शवला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीपासून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात गळती लागली होती. पक्षातील राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजप किंवा इतर पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळे राज्यात काँग्रेसची मोठी घसरण होईल असे चित्र दिसत होते. मात्र, नागरिकांनी हाती घेतलेल्या या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसला सर्वाधिक यश मिळाले. त्यांचे सार्वधिक 13 खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्याचा आत्मविश्वास वाढला आहे.

लोकसभा निवडणुकीचा हा ट्रेंड विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे येथे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेस 115 जागा लढण्यावर ठाम आहे. विशेष म्हणजे दिल्लीतील हायकमांडने तसेच आदेश राज्यातील काँग्रेस नेत्यांना दिले आहेत.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. विशेषतः विदर्भ व मराठवाडयात इतर पक्षातील नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे कॉंग्रेंसने जादा जागेची मागणी केली असली तरी महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी कॉंगेस शरद पवार गट हे दोन पक्ष किती जागा घेणार यावर आघाडीतील जागावाटप ठरणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागून राहिले आहे.

त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी काही दिवसांपूर्वी राज्यात काँग्रेस मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या दाव्यानंतरच महाविकास आघाडीत काँग्रेस अधिक जागावर दावा करू शकतो, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळे आता काँग्रेसने केलेल्या या मागणीनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी कॉंगेस शरद पवार गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT