Salil Deshmukh: भाजपच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही; सलील देशमुखांनी सुनावले

Salil Deshmukh attack on BJP leaders parinay fuke: जामीन मेडीकल ग्राउंडवर नाही तर या प्रकरणात विश्वासार्हता नसल्याच्या मेरीटवर दिला आहे. अनेकजण आता यावर भाष्य करुन जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत, असे ते म्हणाले.
Salil Deshmukh Vs Parinay Fuke
Salil Deshmukh Vs Parinay FukeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणारे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन रद्द करण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. भाजपचे आमदार परिणय फुके व काही नेते देशमुखांना पुन्हा कोठडीत पाठवण्याची मागणी करीत आहेत.

पण, देशमुख यांना मेडिकल ग्राऊंडवर नव्हे तर मेरिटवर जामीन देण्यात आला आहे, असे सांगून त्यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी भाजपच्या धमक्यांना आम्ही घारबत नसल्याचे सांगितले. भाजपच्या नेत्यांनी न्यायालयाचा निकाल वाचावा असाही सल्ला सलील देशमुख यांना दिला.

तीन वर्षांपूर्वी खोट्या आरोपात अनिल देशमुख यांना अटक केली होती. न्यायालयाने त्यांना जामीन देताना जे निरीक्षण नोंदविले आहे ते महत्वाचे आहे. जो जामीन दिला आहे तो मेडीकल ग्राउंडवर नाही तर या प्रकरणात विश्वासार्हता नसल्याच्या मेरीटवर दिला आहे. अनेकजण आता यावर भाष्य करुन जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत, असे ते म्हणाले.

जे लोक जामीन रद्द करुन तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहेत, त्यांनी आधी न्यायालयाने जामीन देताना जे निरीक्षण नोंदविले आहे, त्याचा अभ्यास करावा. ते इंटरनेटवर व सर्वत्र उपलब्ध आहेत. त्यांच्या अशा पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी सांगितले.

Salil Deshmukh Vs Parinay Fuke
Video Samit Kadam: निरोप देणाऱ्या 'त्या' तरुणाचा पलटवार; अनिल देशमुखाचं सगळचं खोडून काढलं!

न्यायालयाने म्हटल्यानुसार अनिल देशमुख यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत. अनिल देशमुख यांच्यावर ऐकीव माहितीवर आरोप करण्यात आले आहे. सर्व कागदपत्रे व निकाल ऐकल्यावर असे दिसते की, भविष्यात अनिल देशमुख या प्रकरणात दोषी ठरू शकणार नाही. दोन वर्षांपूर्वी न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अनिल देशमुख यांना 'क्लिन चिट' दिली आहे, असे असतानाही भाजपचे नेते मंडळी अनिल देशमुख यांना परत तुरुंगात पाठविण्याच्या धमक्या देत आहेत.

ज्या व्यक्तीने खोटे आरोप करण्यासाठी नकार देवून जेलमध्ये जाणे मान्य केले, भाजपाच्या कटकारस्थानाचे ते भाग बनले नाही, त्यांना तुम्ही जेलमध्ये जाण्याच्या धमक्या देतात. आमच्या परिवारावर १३० वेळा छापे टाकण्यात आले. माझ्या सहा वर्षांच्या मुलीची चौकशी करून तिला त्रास देण्यात आला. संपूर्ण परिवाराला अडचणीत आणण्याचे काम केले. मात्र अनिल देशमुख हे झुकले नाहीत, असेही सलील देशमुख यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com