Congress  Sarkarnama
महाराष्ट्र

Congress News : काँग्रेस विधानसभा उमेदवारांच्या निवडीसाठी एक नव्हे, तर तीन सर्वेक्षणांचा घेणार आधार!

Congress and Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर आता विधानसभेलाही याची पुनरावृत्ती करण्यासाठी काँग्रेसने कंबर कसल्याचे दिसत आहे.

Mayur Ratnaparkhe

Congress Assembly Election Candidate Selection : महाराष्ट्रात आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सर्वच पक्ष आपले मतदारसंघ निश्चित करण्याच्या कामात आहेत, तर दुसरीके इच्छुक उमेदवारांपैकी योग्य उमेदवार निवडीसाठीही विविध आराखडे आखले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटातून एक माहिती समोर आली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर आता पक्षाचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. तर लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत करण्यासाठी पक्षाकडून कोणतीही कसर सोडली जाणार नसल्याचे दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून उमेदवार निवडीसाठी काँग्रेस एक नव्हे तर तीन-तीन सर्वेक्षणांचा आधार घेणार आहे.

काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुकीतील उमेदवार निवडीसाठी एक सर्वेक्षण नव्हे, तर तीन-तीन सर्वेक्षण केले जात असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव अविनाश पांडे यांनी दिली आहे.

प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसच्या(Congress) उमेदवारासाठी मोठी इच्छुकांची यादी आहे. प्रत्येकाला उमेदवारी मिळू शकत नाही.. मात्र पक्ष सक्षम आणि जिंकू शकणाऱ्या उमेदवाराला तिकीट देऊ इच्छितो आणि यासाठी एक नाही तर तीन-तीन सर्वेक्षण केले जात असल्याचे अविनाश पांडे म्हणाले. ते नागपूरात डॉ. झाकीर हुसेन विचार मंचाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते.

पहिला सर्वेक्षण अखिल भारतीय काँग्रेस कमिटी कडून केला जात आहे. तर दुसर सर्वेक्षण काँग्रेसचे वॉर रूम कडून केला जात आहे. आणि स्थानिक पातळीवर नेत्यांकडून तिसरा सर्वेक्षणही केला जात आहे. या तीन वेगवेगळ्या सर्वेक्षणाच्या आधारावर महाराष्ट्रात काँग्रेसकडून उमेदवारांची निवड केली जाईल. अशी माहिती अविनाश पांडे यांनी दिली....

तुम्ही सर्व उमेदवार बनवू इच्छिता तुमच्यापैकी काही लोक आपल्या मित्रांना नातेवाईकांना उमेदवार म्हणून पाहू इच्छिता मात्र सर्वांना उमेदवारी मिळणे शक्य नाही. आधी तीन पक्षांमध्ये मतदारसंघांचा वाटप होईल. त्यानंतर उमेदवारांची निवड होईल. पक्ष चांगला उमेदवार देऊ इच्छिते त्यासाठी सर्वेक्षण केले जात आहे. अशी माहिती अविनाश पांडेंनी दिली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT