Rahul Gandhi in kitchen - Video : अन् राहुल गांधी म्हणाले 'मी जास्त तिखट खात नाही'

Rahul Gandhi and Shahub Patole : 'परंतु समाजात खरी सर्वसमावेशकता आणि समानता तेव्हाच शक्य होईल, जेव्हा...' असंही राहुल गांधींनी म्हटलं आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi In Maharashtra News : काँग्रेस नेते राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना त्यांनी शाहू पाटोळे यांच्या घरी भेट दिली. राहुल गांधी केवळ त्यांच्या घरीच गेले नाहीत, तर थेट स्वयंपाकघरात जाऊन त्यांनी स्वयंपकात त्यांना मदतही केली. यावेळी त्यांनी खानपानाचा सामाजिक, राजकीय संबंध कसा येतो याबाबत पटोलेंकडून त्यांचे मत जाणून घेतले. शिवाय, एकत्रितपणे स्वयंपाक करताना काही मजेशीर किस्से देखील यावेळी घडले. या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ राहुल गांधी एक्सवर पोस्ट केला आहे आणि एक पोस्टही शेअर केली आहे.

राहुल गांधी(Rahul Gandhi) म्हणतात, 'आजही दलित किचन बाबत फार कमी लोक जाणतात. जसं शाहू पाटोळे यांनी म्हटले की, दलित काय खातात, कोणालाच माहीत नाही. ते काय खातात, काय बनवतात आणि याचे सामाजिक आणि राजकीय महत्त्व काय आहे, या उत्सुकतेपोटी मी अजय तुकाराम सनदे आणि अंजना तुकाराम सनदे यांच्याबरोबर एक दुपार घालवली.'

Rahul Gandhi
Assembly Election 2024 : भाजपची सत्ता ‘या’ सहा कारणांमुळे जाणार; काँग्रेसनंही संधीचं सोनं केलं...

तसेच 'त्यांनी मला कोल्हापुरातील त्यांच्या घरी सन्मानाने बोलावून मला स्वयंपाकघरात मदत करण्याची संधी दिली. आम्ही मिळून हरभऱ्याची भाजी आणि वांग्यासोबत तुरीच्या दाळीचं वरण बनवलं. पाटोळे आणि सनदे कुटुंबाच्या जाती आणि भेदभावांबाबतच्या खासगी अनुभवांवर बोलताना, आम्ही दलित खानपानाबाबत जागृतीची उणीव आणि या संस्कृतीच्या दस्ताऐवजीकरण्याच्या महत्त्वावर चर्चा केली.'

याशिवाय त्यांनी 'बहुजनांना संविधानाने हिस्सेदारी आणि अधिकार दिले आहेत आणि त्या संविधानाचे आम्ही रक्षण करू. परंतु समाजात खरी सर्वसमावेशकता आणि समानता तेव्हाच शक्य होईल, जेव्हा प्रत्येक भारतीय बंधुतेची भावना मनात ठेवून प्रयत्न करेल.'

Rahul Gandhi
Haryana Election : एक खुर्ची, चार नेते! काँग्रेस कुणाच्या गळ्यात टाकणार मुख्यमंत्रिपदाची माळ, कुणाचं पारडं जड?

यावेळी शाहू पाटोळे म्हणाले, माझं एक पुस्तक आलं आहे 'दलित किचन ऑफ मराठवाडा'. मराठी दैनिकातही अन्नपदार्थांबाबत लिखाण सुरू झालं होतं. त्यामध्ये आम्ही कुठंच नव्हतो, मला वाटलं मी शोधायला हवं की माझे पूर्वज काय खात होते. मी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि मग मी आम्हाला शोधलं आहे. खाण्याला धर्माशी जोडलं गेलं आहे, तुम्ही काय खाता यावर तुम्ही मोठे की लहान हे ठरवलं जातं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com