बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघा 1 तास शिल्लक असताना काँग्रेसने बारामतीमधून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ही अधिकृत घोषणा केली.
या निर्णयामागे भावनिक आणि राजकीय दोन्ही कारणे असल्याचे दिसून येते. अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे बारामतीत शोककळा पसरली होती. त्यांच्या निधनाने सर्वच स्तरावर हळहळ व्यक्त होत असताना ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली होती. यासाठी काँग्रेसने सहकार्य करावे, अशी विनंतीही करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली. या बैठकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेण्याची मागणी करण्यात आली. त्यावर सपकाळ यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा करून 15 ते 20 मिनिटांत अंतिम निर्णय जाहीर करू, असे सांगितले होते.
दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे स्पष्ट झाले. तसेच, रोहित पवार यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी गती मिळाली. या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सपकाळ यांनी शरद पवारांना सल्ला देण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगू लागल्या होत्या.
अखेर सर्व घडामोडींना पूर्णविराम देत काँग्रेसने माघार घेतली आणि बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात नवा संदेश गेला असून पुढील काळात त्याचे परिणाम काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.