Congress Leader Resign : मतदानापूर्वी काँग्रेसला झटका; आसाममध्ये बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा! नेमकं कारण काय?

senior congress leader quits suddenly : मतदानाच्या दिवशी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. एका बड्या नेत्याने अचानक राजीनामा दिल्याने राजकारणात खळबळ उडाली. नेमकं कारण जाणून घ्या.
congress
congressSarkarnama
Published on
Updated on

आसामसह तीन राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रकिया सुरु असतानाच काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याची घटना समोर आली आहे. मतदानाच्या दिवशीच उदलगुरी मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेन दायमारी यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली आहे. पक्षाचा राजीनामाही जाहीर केला आहे. या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सुरेन दायमारी यांनी सांगितले की, पक्षात राहून त्यांना काहीच फायदा झाला नाही आणि त्यांच्याशी विश्वासघात झाला आहे. त्यांनी काँग्रेसवर आरोप करत म्हटलं की, पक्ष केवळ अल्पसंख्यांकांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतो आणि आदिवासी समाजाकडे दुर्लक्ष करतो. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या समाजासाठी कोणतेही ठोस काम झालेले नाही.

congress
Pune Police crime : पुण्यात रक्षकच बनले भक्षक! 55 वर्षीय प्राचार्यांना 'पोक्सो'ची भीती दाखवून पोलिसांनीच उकळली खंडणी!

विशेष म्हणजे, त्यांनी उमेदवारी मिळाल्यानंतरही पक्षाने त्यांचा प्रचार केला नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. अनेक वेळा पक्षाकडे मदत मागूनही कोणत्याही नेत्याने प्रतिसाद दिला नाही. जिल्हा काँग्रेस कमिटीनेही साथ दिली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या सर्व कारणांमुळे त्यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

दरम्यान, त्यांनी माघार घेतली असली तरी त्यांचे नाव ईव्हीएममध्ये कायम राहणार आहे, त्यामुळे मतदारांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी मात्र वेगळी भूमिका मांडली असून, दायमारी यांनी अधिकृतरित्या राजीनामा सादर केलेला नसल्याचे सांगितले आहे.

congress
Mamata Banerjee : PM मोदींसह बहुतेक नेत्यांना जमलं नाही, ते ममतादीदींबाबत घडलं; उमेदवारी अर्जात धक्कादायक माहिती...

कोण आहेत सुरेन दायमारी?

सुरेन दायमारी हे 73 वर्षांचे अनुभवी नेते असून ते निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांनी जानेवारी महिन्यात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या मते, उदलगुरी मतदारसंघात काँग्रेसची ताकद कमी असूनही त्यांनी पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. त्यांनी असेही नमूद केले की, त्यांनी स्वतःहून उमेदवारी मागितलेली नव्हती.

या अचानक घडलेल्या घटनेमुळे मतदानाच्या दिवशीच काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com