Pooja Khedkar Audi Sarkarnama
महाराष्ट्र

Pooja Khedkar : ऑडीत फिरणाऱ्या पूजा खेडकर आल्या ताळ्यावर; आता वाशिममध्ये ‘ही’ गाडीच ‘लयभारी’…

Rajanand More

Pune : वादग्रस्त ट्रेनी आयएएस पूजा खेडकर या वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली होताच ताळ्यावर आल्या आहेत. पुण्यात असताना ऑडी ही आलिशान कार त्यांच्या दिमतीला होती. कारवर अंबर दिवाही लावला होता. स्वतंत्र सुसज्ज कार्यालय, स्टाफ अशा मागण्या त्यांनी केल्या होत्या.

IAS पूजा खेडकर गुरूवारी वाशिम कार्यालयात रुजू झाल्या. वादावर त्यांनी काल पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया दिली. यावर बोलण्यास आपण अधिकृत व्यक्ती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. खेडकर यांचा वाद आता केंद्र सरकारच्या दरबारी गेला असून चौकशीसाठी एक सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे.

दरम्यान, पुण्यात ऑडीमध्ये फिरणाऱ्या पूजा यांना वाशिममध्ये बोलेरो गाडीतून फिरावे लागत आहे. ही शासकीय गाडी असल्याने त्यावर महाराष्ट्र शासन लिहिले आहे. मात्र, कोणताही दिवा गाडीवर नाही. पुण्यात मात्र, पूजा यांच्या ऑडीवर अंबर दिवा लावण्यात आला होता.

पूजा यांनी गुरूवारी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. बोलेरो गाडीतूनच त्या कार्यालयात दाखल झाल्या होत्या. त्यामुळे बदली होताच त्यांच्या बदललेल्या राहणीमानाची चर्चा रंगली आहे.

पुणे पोलिस करणार कारवाई

पुणे पोलिसांकडून पूजा खेडकर यांच्या ऑडीवर कारवाई केली जाणार आहे. ऑडीवर 21 हजारांचा दंड प्रलंबित आहे. तसेच अंबर दिवा लावणे आणि व्हीआयपी क्रमांकाबाबत पोलिसांकडून मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई केली जाऊ शकते. त्यासाठी काल वाहतूक पोलिस त्यांच्या घरी गेले होते. पण घराच्या गेटला आतून कुलूप असल्याने त्यांना आत जाता आले नाही.

केंद्र सरकारकडून दखल

पूजा खेडकर यांची संपत्ती कोट्यवधींच्या घरात आहे. मात्र, त्यानंतरही त्यांनी कमी उत्पन्न असल्याचे दाखवून क्रिमिलेअरचे प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षण मिळवले. तसेच दृष्टी कमजोर असल्याचे सांगत दिव्यांगातून आरक्षणाचाही फायदा घेतला आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे. पुढील दोन आठवड्यांत केंद्र सरकारला अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT