IAS Officer Pooja Khedkar : पूजा खेडकर यांचा आई-वडिलांबद्दल मोठा दावा, म्हणाल्या, "ते दोघे..."; व्हिडिओ व्हायरल

Pooja Khedkar News : पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्यामुळे दिवसेंदिवस खेडकर यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
Pooja Khedkar
Pooja Khedkar sarkarnama
Published on
Updated on

Pune News : भारतीय प्रशासकीय सेवेतील ( आयएसएस ) प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारनं एकसदस्यीय समिती नियुक्त केली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण मंत्रालयातील एका अतिरिक्त सचिवांमार्फत ही चौकशी केली जाणार आहे.

पुण्याचे (Pune) जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी तयार केलेला अहवाल केंद्र सरकारला पाठविण्यात येणार आहे. यातच पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्याबाबत नवनवीन खुलासे समोर येत आहे.

पूजा खेडकर यांचा एक मॉक इंटरव्हू सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात आई-वडील विभक्त झाल्याचा दावा पूजा खेडकर यांनी केला आहे. तर, माजी सनदी अधिकारी आणि पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी कुटुंब एकत्रित असल्याचं बोललं आहे.

Pooja Khedkar
Pooja Khedkar News : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांना पुणे पोलिसांनी पाठवले समजपत्र!

व्हिडीओत काय?

एका यूट्यूब चॅनलने पूजा खेडकर यांची मुलाखत घेतली आहे. पूजा खेडकर यांनी शून्य उत्पन्न असल्याचं दाखल केलेल्या अर्जात म्हटलं आहे. त्यामुळे मुलाखतकारानं पूजा यांना त्यांच्या वडिलांबद्दल प्रश्न विचारला. 'तुमचे वडील बँकेत कामाला आहेत की कुठे?' असा सवाल विचारल्यावर पूजा म्हणाल्या, "माझे वडील नागरी सेवेत कार्यरत आहेत."

त्यानंतर मुलाखतकारानं विचारलं, 'मग शून्य उत्पन्न कसं काय?' त्यावर पूजा यांनी म्हटलं की, "माझे आई-वडील विभक्त झाले आहेत. मी आईबरोबर राहते. माझा माझ्या वडिलांबरोबर कोणताही संपर्क नाही."

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीकडून (Vanchit Aghadi) लढलेले आणि पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी कुटुंब एकत्रित असल्याचं प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामुळे तर्कवितर्क लढवण्यात येत आहे.

दरम्यान, पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे. त्यात पूजा खेडकर यांच्या प्रशिक्षण कालावधीतील गैरवर्तणुकीबाबत तपशील दिला आहे. खासगी चारचाकीला लाल दिवा लावणे, अपर जिल्हाधिकारी यांचे खासगी कार्यालयीन दालन पूर्वपरवानगी न घेता वापरण्यास घेणे, प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याला स्वतंत्र दालन, वाहन, शिपाई या सुविधा अनुज्ञेय नसतानाही याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी, खेडकर यांच्या वडिलांकडून या सुविधा देण्याबाबत सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारांना अयोग्य शब्दप्रयोग वापरणे, अपर जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खासगी दालनातील सर्व साहित्य बाहेर काढून तेथे स्वत:चे कार्यालय स्थापन करणे अशा तक्रारींचा या पत्रात समावेश आहे.

हा अहवाल राज्य सरकारकडून केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी व निवृत्तीवेतन मंत्रालय आणि मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमीला पाठविण्यात येणार आहे.

Pooja Khedkar
Pooja Khedkar : IAS पूजा खेडकर यांची वादावर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, सॉरी...

खेडकर यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह का?

  • पूजा खेडकर यांची नियुक्ती केंद्रीय लोकसेवा आयोगातून (यूपीएससी) झाली आहे. नॉन क्रिमिलेयर आणि बहुविकलांगता (मल्टिपल डिसॅबिलिटी) या दोन प्रकारांतून त्यांची निवड झाल्याचे शासनाच्या संकेतस्थळावर दिसून येत आहे.

  • नॉन क्रिमिलेयरसाठी पालकांचे उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असायला हवे. मात्र, खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची मालमत्ता ४० कोटींहून अधिक असल्याचे दाखवले आहे. त्यामुळे खेडकर यांच्या नॉन क्रिमिलेयरसाठीच्या पात्रतेबाबतही प्रश्नचिन्ह आहे.

  • खेडकर यांनी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणात (कॅट) ‘यूपीएससी’ विरोधात याचिका दाखल केली होती. त्यावर, ‘यूपीएससी’ने सांगूनही त्या सहा वेळा वैद्याकीय तपासणीसाठी गैरहजर राहिल्या. तरीही त्यांना प्रशासकीय सेवेत कसे घेतले, हा प्रश्न आहे.

  • प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांचा गृहजिल्हा नोकरीच्या सर्वांत शेवटी मिळतो, असे असूनही खेडकर यांना सुरुवातीलाच पुणे जिल्हा कसा मिळाला, याबद्दलही आश्चर्य व्यक्त होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com