Councillors Join Shivsena  shivsena
महाराष्ट्र

Councillors Join Shivsena : 5 नगरसेवकांचा मोठा निर्णय, थेट शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!

Murtijapur Councillors : एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पाच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेची ताकद वाढली आहे.

Roshan More

Shivsena Politics : अकोला जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे इनकमिंग झालेय. मूर्तिजापूर नगरपरिषदेतील पाच अपक्ष नगरसेवकांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडलाय.

शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांमध्ये संदीप दौलतराव सरनाईक, सारिता काळे पाटील, पूनम रवी मोडक, ममता कैलास महाजन आणि शुभांगी संदीप सरनाईक यांचा समावेश आहे.

या पाचही नगरसेवकांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय सहकारी ॲड. निलेश देशमुख यांची अकोल्यात भेट घेतली होतीय. त्यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान, अकोल्यातील शिवा मोहोड यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहेय. मोहोड हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष, महानंदचे संचालक, अकोला जिल्हा दूध संघाचे संचालक, शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष आणि अकोला महापालिकेचे माजी बांधकाम सभापती राहिलेयेत.

शिवसेनेची ताकद वाढली

मूर्तिजापूरच्या पाच अपक्ष नगरसेवकांच्या प्रवेशामूळे नगरपालिकेत शिवसेनेच्या पक्षाचे बळ वाढले आहे. 25 जागा असलेल्या या नगरपालिकेत भाजप 11, एकनाथ शिंदेंच्या 07 तर,वंचितच्या 05 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या 02 जागा आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT