Uddhav Thackeray in action mode on covid 19 

 

Sarkarnama 

महाराष्ट्र

महाराष्ट्र 'हायरिस्क'वर : ६ दिवसांत रूग्णसंख्या तिप्पट, मुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये!

Covid-19 Patient in maharashtra : तातडीने टास्कफोर्सची बैठक बोलवण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र (Maharashtra) राज्य पुन्हा एकदा हायरिस्कवर आले आहे. मागच्या ६ केवळ दिवसांत राज्यात कोरोना (Covid-19) रुग्णांची संख्या तिपटीने वाढल्याची धक्कादायक माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्य मंत्रिमंडळाला सोमवारी दिली आहे. जानेवारीच्या मध्यात कोरोना रुग्णांच्या सक्रिय आकड्यांमध्ये वाढ होण्याची शक्यताही या विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यानंतर आज रात्री तातडीने टास्कफोर्सची बैठक बोलवण्यात आली आहे.

८ डिसेंबर रोजी राज्यात कोरोनाचे ६ हजार २०० सक्रिय रुग्ण होते. मात्र आज ही संख्या १० हजारांवर गेली आहे. गेल्या २० दिवसांत सक्रिय रुग्णांच्या संख्येत ५० टक्क्यांची वाढ झाली असून राज्यात पॉझिटिव्हिटीचा रेट १.०६ टक्के झाल्याची माहितीही सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोरोनाचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सार्वजिनक विभागाच्या माहितीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सुचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी डॉ. व्यास यांनी आपल्या सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोरोनाच्या सक्रिय रुग्णांत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण करणेही गरजेचे असून काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला ८ लाख डोस देत होतो. सध्या दिवसाला ५ लाख डोस दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.

सध्या खबरदारीचे प्राथमिक उपाय म्हणून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच लग्न आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये १०० जणांच्या उपस्थितीचेही निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच चित्रपटगृह, नाट्यगृह याठिकाणची उपस्थिती ५० टक्क्यांवर आणली आहे. आता यात आणखी काही निर्बंध कडक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT